Parenting tips in Marathi, health care tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

स्मार्टफोनच्या व्यसनापासून मुलांची करा सुटका

मुलांना लागलेली स्मार्टफोनची सवय पालकांसाठी ठरते आहे अडचणीचे कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे मुलांचा अभ्यास व इतर कामे घरातूनच होत होती. त्यामुळे बहुतांश मुले स्मार्ट फोन (Phone), कम्प्युटर आणि टीव्हीसमोर तासनतास घालवू लागली होती परंतु, मुलांची ही सवय आज पालकांसाठी अडचणीची ठरत आहे.

स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत, पण त्याचा मानसिक परिणामही मुलांवर सध्या दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत अनेक मुले(Child) तणाव, चिडचिड, राग यांचे शिकार होऊ लागली आहेत. मात्र, काही खास युक्त्या अवलंबून मुलांना स्मार्टफोनच्या व्यसनापासून सहज सुटका मिळू शकते.

हे देखील पहा -

३. ऑनलाइन क्लासेस आणि इंटरनेटच्या युगात मुलांनी हातात पुस्तक घेणे फार कठीण आहे. अशावेळी मुलांना पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त करा. यासाठी तुम्ही मुलांना त्यांच्या आवडीच्या कथांचे आणि कार्टूनचे पुस्तक भेट देऊ शकता. कधी कधी मुलांसोबत आपण देखील पुस्तक वाचायला हवी. त्यामुळे मुलांना फोनपासून दूर राहण्यास मदत होईल.

४. घरातील कामे करताना मुलांना शक्य तितके घरातील कामामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील कपडे सुकवणे, खोली, स्वयंपाकघर साफ करणे अशा छोट्या कामात मुलांची मदत घ्या. तसेच, काम करताना मुलांसोबत त्या क्षणांचा आनंद घ्यायला विसरू नका. यामुळे मुलं आपल्याला घरच्या कामात मदत तर करतील आणि फोनपासून दूर राहायला लागतील.

५. मुलांना फोनपासून दूर ठेवण्यासाठी आपण फोनला लॉकही लावू शकता. यासाठी मुलांचे फोन वापरण्याची वेळ आणि तास निश्चित करा आणि त्याच वेळी फोनचे लॉक मुलांना उघडून द्या.

मुलांना फोनपासून दूर ठेवण्यासाठी पालकांना देखील त्याचे भान असणे गरजेचे आहे. मुलांसमोर शक्यतो आपणही फोन वापरण्याचे टाळा. अगदीच आवश्यक असेल तर फोनचा वापर करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Shreeram Lagoo: अभिनयाची आवड, ४२ व्या वर्षी डॉक्टरकीला रामराम, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: शरद पवार यांच्या बॅगांची रायगडमध्ये तपासणी

SCROLL FOR NEXT