gen z language trends marathi context saam tv
लाईफस्टाईल

GenZ Trends : कौतुक करायचंय? मग ‘सुंदर’ म्हणू नका! Gen Z च्या नव्या शब्दाचा अर्थ ऐकून व्हाल थक्क

new gen z slang for appreciation : आजच्या पिढीची भाषा खूपच झपाट्याने बदलत चालली आहे. जुन्या काळात वापरले जाणारे 'सुंदर' किंवा 'अप्रतिम' हे शब्द आता मागे पडले असून, त्याऐवजी अगदी छोट्या आणि हटके शब्दांचा ट्रेंड आला आहे.

Saam Tv

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणांच्या बोलण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीत मोठे बदल होत आहेत. विशेषतः Gen Z म्हणजेच नव्या पिढीने संवादासाठी स्वतःची वेगळी भाषा तयार केली आहे. एखाद्याची सुंदरता, कपडे किंवा कामाचे कौतुक करताना पूर्वी ‘सुंदर’, किंवा ‘कमाल’ असे शब्द वापरले जायचे. मात्र, आता या शब्दांची जागा ‘इट्स गिव्हिंग’, ‘एट’ आणि ‘स्ले’ यांसारख्या नव्या स्लँग शब्दांनी घेतली आहे. सोशल मीडिया कमेंट्सपासून मित्रांच्या गप्पांपर्यंत या शब्दांचा वापर वाढताना दिसत आहे.

काय आहे ‘इट्स गिव्हिंग’

Gen Z मध्ये ‘इट्स गिव्हिंग’ हा शब्दप्रयोग एखाद्या व्यक्तीचा लूक किंवा अंदाजे एखाद्या विशिष्ट गोष्टीची आठवण करून देत असेल, तेव्हा केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या तरुणीने आकर्षक ड्रेस परिधान केला आणि तिचा लूक एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे वाटत असेल, तर ‘इट्स गिव्हिंग हिरोइन व्हाइब्स’ असे म्हटले जाते. म्हणजेच तिचा संपूर्ण अंदाज एखाद्या हिरोइनसारखा दिसत आहे.

‘एट’ म्हणजे नेमके काय?

‘एट’ हा शब्दही सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. एखाद्या व्यक्तीने एखादे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले असेल, तर तिचे कौतुक करण्यासाठी ‘यू एट’ असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, एखाद्याने सुंदर फोटो काढला, उत्तम डान्स केला किंवा छान ड्रेस निवडला, तर ‘यू एट’ म्हणत त्याचे कौतुक केले जाते. याचा साधा अर्थ म्हणजे ‘तू कमाल केलीस’.

‘स्ले’ शब्दाचा वापर कधी होतो?

‘स्ले’ हा शब्द एखाद्याच्या आकर्षक लूक, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करण्यासाठी वापरला जातो. पार्टीमध्ये एखादी व्यक्ती अतिशय स्टायलिश अंदाजात आली, तर तिला ‘यू स्ले’ असे म्हटले जाते. म्हणजेच तू सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेस.

Gen Z ला हे शब्द का आवडतात?

या शब्दांचा वापर करण्यामागे त्यांची छोटी आणि प्रभावी रचना हे महत्त्वाचे कारण आहे. मोठी वाक्ये बोलण्याऐवजी कमी शब्दांत भावना व्यक्त करणे तरुणांना आवडते. या शब्दांमधून कौतुकासोबतच उत्साह, मैत्री आणि आत्मविश्वासही व्यक्त होतो. त्यामुळे Gen Z ची ही नवी भाषा सोशल मीडियावर लोकप्रिय होत असून, कौतुक करण्याची पद्धतही काळानुसार बदलत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: दिलासादायक बातमी! चांदी १ हजारांनी स्वस्त; सराफा बाजारात सोन्याची किंमत किती? पाहा ताजे दर

Lemon Storage Tips: कापलेले लिंबू अनेक दिवस राहील ताजे! वापरा या ७ भन्नाट ट्रिक्स

Bike Washing: बाईक गरम असताना पाणी टाकून धुवावी का?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत जनजातीय गौरवाचा महाकुंभ!

PPF Vs SSY: पीपीएफ की सुकन्या योजना, २१ वर्षांत कोणती स्कीम तुम्हाला मालामाल बनवणार? पाहा अचूक आकडा

SCROLL FOR NEXT