Ganesh Chaturthi 2025 Saam TV
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी लाडका बाप्पा लवकर येणार; वाचा २०२५ मधील गणेश चतुर्थीची तारीख

Bappa Arrive 11 Days Early : पुढच्या वर्षी बाप्पा खरोखर लवकर येणार आहेत. साल २०२५ मध्ये ऑगस्ट महिन्यामध्येच गणेश चतुर्थी आली आहे.

Ruchika Jadhav

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', या घोषणेत दरवर्षी आपण लाडक्या बाप्पाला निरोप देतो. विसर्जनाच्या दिवशी बऱ्याच व्यक्ती बाप्पाच्या आठवणींनी व्याकुळ होतात. अनेकांचे डोळे आसवांनी पाणवतात. अशात काल रविवारी दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी देखील सर्वांनी बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या, अशी विनवणी केली आहे. अशात तुम्हाला माहिती आहे का पुढच्या वर्षी बाप्पा खरोखर लवकरच येणार आहेत.

पुढच्या वर्षी गणराया लवकर येणार

पुढच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीची तारीख समोर आली आहे. या तारखेनुसार पुढल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये गणपती बाप्पा खरोखर लवकर येणार आहे. बाप्पा तब्बल ११ दिवस आधी त्याच्या भक्तांच्या भेटीला येणार आहे.

२०२५ मध्ये गणेश चतुर्थी कधी

पुढल्या वर्षी म्हणजे २०२५ मधील गणेश चतुर्थीची तारीख २७ ऑगस्ट आहे. यंदा ७ सप्टेंबरला बाप्पा घरोघरी विराजमान झाला आहे. मात्र पुढल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातच तुमच्या घरी येणार आहे. तसेच २०२५ मध्ये अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर २०२५ ला आहे.

साल २०३० पर्यंत बाप्पा एकूण ४ वर्ष लवकर येणार आहे. त्यामुळे आता २०३० पर्यंत बाप्पा घरी केव्हा येणार त्याच्या तारखा आणि वार जाणून घेऊ.

२०२५ - २७ ऑगस्ट (बुधवार)

२०२६ - १४ सप्टेंबर (सोमवार)

२०२७ - ४ सप्टेंबर (शनिवार)

२०२८ - २३ ऑगस्ट (बुधवार)

२०२९ - ११ सप्टेंबर (मंगळवार)

२०३० - १ सप्टेंबर (रविवार)

पुढील पाच वर्षांच्या तारखा आणि वार

२०३१ - २० सप्टेंबर (शनिवार)

२०३२ - ८ सप्टेंबर (बुधवार)

२०३३ - २८ ऑगस्ट (रविवार)

२०३४ - १६ सप्टेंबर (शनिवार)

२०३५ - ५ सप्टेंबर (बुधवार)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT