Gandhi Jayanti 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधी ते राष्ट्रपिता; जाणून घ्या बापूंच्या आयुष्यातील प्रेरणादायी गोष्टी

Gandhi Jayanti : 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Father Of Nation Mahatma Gandhi :

2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमध्ये झाला. त्याचे संपूर्ण नाव 'मोहनदास करमचंद गांधी' आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अनेक भारतीयांना एकत्रित केले. अंहिसेचा मार्ग अवलंबून त्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण भारतात झाले. त्यानंतर ते इंग्लडला गेले. त्यानंतर ते पुन्हा भारतात आले. त्यानंतर त्यांनी आफ्रिकेचा प्रवास केला. त्यादरम्यान आलेल्या अनुभवानंतर त्यांनी हक्कासाठी सत्याग्रह केला. महात्मा गांधीनी देशासाठी केलेल्या काही चळवळींची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. स्वातंत्र्य चळवळ

गांधीजीनी देशासाठी अनेक चळवळी केल्या. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. त्यात खिलाफत चळवळ, मीठाचा सत्याग्रह, दांडी मार्च अशा अनेक चळवळींचे नेतृत्व त्यांनी केले. या वेळी त्यांनी संपूर्ण अहिंसेचे तत्व अंगिकारले. हिंदू मुस्लिम समाजात एकोपा आणि त्यांनी संघटित करण्यासाठी हा प्रयत्न होता.

2. स्वातंत्र्यानंतर मोलाची कामगिरी

गांधीजीनी स्वातंत्र्यनंतर सामाजिक आणि आर्थिक सुधारणांसाठी अनेक कामे केली. सत्य, अंहिसा या मार्गावर चालण्याची लोकांनी प्रेरणा दिली.

3. गांधीजीचा साधेपणा

गांधीजीनी जगाला साधेपणाची ओळख करुन दिली. ते त्यांचे आयुष्य साधेपणा, अंहिसा, सत्य या मुल्यांवर जगले. धोतर घालून आश्रमात राहणारे गांधीजी सर्वांसाठी प्रेरणास्थान झाले. भारतीयांनी त्यांना वडीलांचा दर्जा दिला. लोक त्यांना बापू असेही म्हणतात.

4. राष्ट्रपिता महात्मा गांधी

सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सर्वात आधी 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे खूप योगदान होते. स्वातंत्र्यलढ्यात ते महत्त्वाचे नेते होते. तेव्हापासून त्यांना 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT