cancer treatment x
लाईफस्टाईल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

Cancer Treatment : कॅन्सरवर एका फ्रेंडली बॅक्टेरियामुळे मात करता येणार आहे.. हा 'फ्रेंडली बॅक्टेरिया' नेमका कोणता आहे.. पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट..

Suprim Maskar

कॅन्सर म्हटल की अनेकांना धडकी भरते. भारतातच नाही तर जगभरात कॅन्सर ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र आता एक 'फ्रेंडली बॅक्टेरिया' रुग्णाच्या शरीरात जाऊन थेट कर्करोगाशी लढाई करू शकणार आहे...ज्यामुळे भविष्यात बॅक्टेरियाच्या मदतीने कॅन्सरवर प्रभावी उपचार होऊ शकतील, अशी अपेक्षा वैज्ञानिकांनी व्यक्त केलीय... हा 'फ्रेंडली बॅक्टेरिया' कोणता आहे? वैज्ञानिकांनी नेमकं काय संसोधन केलयं... पाहूयात...

आयआयएसईआर अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या कोलकात्याच्या संशोधकांनी 'फ्रेंडली बॅक्टेरिया' विकसित केलाय. 11 जणांची टीम प्रोबायोटिक्स तयार करतेय... या प्रकल्पाला 'रीसेट' अर्थात 'रिप्रोग्रॅमिंग द सप्रेसिव्ह एन्व्हायन्मेंट ऑफ ट्युमर मायक्रोएन्व्हायन्मेंट' असं नाव देण्यात आलयं... हा बॅक्टेरिया ट्यूमरला ओळखून त्याची क्रिया थांबवेल आणि शरीराच्या आतूनच कर्करोगावर मात करण्यात मदत करेल...

दरम्यान लंडनमधील इम्पिरियल कॉलेज आणि जर्मनीतील कोलोन विद्यापीठातील संशोधकांनीही ट्यूमरच्या आतील बॅक्टेरियांचा अभ्यास केला.. 2- मिथाइल आइसोसाइट्रेट नावाचा अणू कर्करोगाच्या पेशींना कमकुवत करत असल्याचा शोध संशोधकांनी केलाय..या शोधामुळे भविष्यात बॅक्टेरियाच्या मदतीने कॅन्सरवर प्रभावी उपचार होऊ शकतील, अशी वैज्ञानिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आता हा 'फ्रेंडली बॅक्टेरिया' रुग्णासाठी किती फायदेशीर ठरतो? आणि याचा वापर रुग्णांसाठी कधी केला जातो? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT