शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा केल्याने सुख-समृद्धी नांदते तसेच घरात पैसा टिकून राहातो. ज्योतिषशास्त्राच्या मते जर शुक्र ग्रह प्रबळ करायचा असेल तर देवी लक्ष्मीची नियमितपणे उपासना करावी.
कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीची (Mata Lakshmi) पूजा केल्याने तिला प्रसन्न करता येते पण शुक्रवारी पूजा करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवार येत असल्याने कोणते खास उपाय केल्यास आपल्याला धनसंपत्ती (Money) प्राप्त होईल जाणून घेऊया.
1. शुक्रवारी करा हे उपाय
शुक्रवारी सकाळी उठल्याबरोबर देवी लक्ष्मीचे ध्यान करुन तिला नमस्कार करा. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून ध्यान करावे. गुलाबी रंग हा देवी लक्ष्मीचा आवडता आहे. त्यामुळे शुक्रवारी हा रंग परिधान करु शकता. यानंतर श्रीसूक्ताचा पाठ करु शकता.
शुक्रवारी पूजा करताना देवीला दोन लवंगा अर्पण करा. याशिवाय पूजेच्या वेळी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. तसेच शुक्रवारी तांदळाची खीर बनवून देवी लक्ष्मीला अर्पण करा. प्रसाद म्हणून घरात सगळ्यांना द्या.
शुक्रवारी पैशांची देवाणघेवाण करु नका. तसेच या दिवशी साखर (Sugar) किंवा चांदी कोणालाही दान करु नका. असे केल्याने कुंडलीतील शुक्र कमजोर होतो. यासोबतच शरीर आणि मनाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. यामुळे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.