FREQUENT URINATION AT NIGHT saam tv
लाईफस्टाईल

रात्री वारंवार लघवीला जावं लागतंय, काही गंभीर आजाराचे संकेत तर नाहीत ना? जाणून घ्या

Frequent Urination At Night Causes Excess Salt Intake: रात्री वारंवार लघवीसाठी जाग येतेय? किडनी किंवा प्रोस्टेटच्या समस्येसोबतच आहारातील मिठाचे अतिसेवनही यामागचे कारण असू शकते. डॉक्टरांनी सांगितलेली कारणे, संशोधन आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Omkar Sonawane

रात्री शांत झोप लागलेली असताना अचानक लघवीसाठी जाग येते का? अनेकांना रात्री वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होतो. अशा वेळी अनेकजण याचा संबंध किडनीचा आजार किंवा प्रोस्टेटच्या समस्येशी जोडतात. मात्र तुमच्या आहारातील मिठाचे अतिसेवनही यामागचे एक महत्वाचे कारण असू शकते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे रात्री वारंवार लघवी का होते? याबाबत डॉक्टरांनी महत्वाची माहिती दिली आहे. दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजच्या मेडिसीन विभागातील डॉ. एल. एच. घोटेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शरीराच्या योग्य कार्यासाठी सोडीयम आवश्यक असले तरी त्याचे प्रमाण जास्त झाल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त मीठ खाते, तेव्हा शरीरातील सोडीयमचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरात पाणी साठून राहण्याची म्हणजेच वॉटर रिटेन्शनची समस्या निर्माण होऊ शकते. शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी किडनी लघवी तयार करते. परिणामी विशेषतः रात्री वारंवार लघवीला जावे लागू शकते. मात्र आहारात मिठाचे प्रमाण कमी असूनही रात्री वारंवार लघवीचा त्रास होत असेल, तर तयाकडे दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने किडनी आणि प्रोस्टेटशी संबंधित तपासण्या करून घेणे आवश्यक आहे.

'Neurourology and Urodynamics' या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात 321 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. या संशोधनात आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्याचा परिणाम तपासण्यात आला. या अभ्यासात ज्या लोकांनी आपल्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी केले, त्यांना रात्री लघवीसाठी उठण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. विशेष म्हणजे, या रुग्णांना किडनी किंवा प्रोस्टेटशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे रात्री वारंवार लघवी होत असल्यास आहारातील मिठाच्या प्रमाणाकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला दररोज रात्री दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावे लागत असेल आणि त्यामुळे झोपेवर परिणाम होत असेल, तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हजारो किलोमीटरचा प्रवास करून आला हिवाळी पाहुणा! बोर धरणावर दुर्मिळ ‘युरेशियन स्पॅरोहॉक’चे आगमन

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! कापसाच्या शेतात गांजाची शेती; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Skin Care : तरूण तुर्क...चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना करा 'बाय-बाय'! नितळ आणि टवटवीत त्वचेसाठी ५ रामबाण उपाय

या फोटोमध्ये एकूण किती पक्षी लपलेले आहेत?

बाईक-चारचाकीवर जात लिहिणाऱ्यांची आता खैर नाही; वाहनांबाबत 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT