Stomach Ulcer Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Symptoms of Stomach Ulcer : पोटात गाठ झाल्यावर सुरुवातीला दिसतात हे 4 मोठे बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Stomach Ulcer Symptoms : पोटाच्या अल्सरची समस्या उद्भवल्यास अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. यामध्ये पोटात गाठ होऊन अल्सर होण्याचा धोका असतो. ज्याकडे लक्ष देणं आणि वेळेवर उपचार करणं आवश्यक आहे. जाणून घेऊया पोटाच्या अल्सरची लक्षणे कोणती आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

अयोग्य आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे आजकाल अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये लोकांना पोटासंदर्भातील समस्यांचीही तक्रार जाणवते. यामध्ये पोटात गॅस, अपचन, पोट फुगणं इत्यादी तक्रारी असणं सामान्य आहे, परंतु जर पोटात अल्सर किंवा गाठ असेल तर ते खूप गंभीर असू शकतं.

पोटात अल्सर झाल्यास लहान आतड्याच्या अस्तरामध्ये जखम किंवा गाठ तयार होते. यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि अपचन होऊ शकतं. यावेळी वेळेवर उपचार आणि योग्य काळजी घेतल्यास तुमची समस्या कमी होऊ शकते. परंतु वेळेवर उपचार मिळवण्यासाठी या समस्येची लक्षणं जाणून घेतली पाहिजेत.

विनाकारण वजन कमी होणं

पोटात अल्सर झाल्यास व्यक्तीची भूक कमी होते. ज्यामुळे त्यांचे वजन देखील वेगाने कमी होऊ लागतं. बरेचदा लोक त्यांच्या कमी होत असलेल्या वजन दुर्लक्ष करतात. ही परिस्थिती नंतर फार गंभीर होऊ शकते. शरीरात दीर्घकाळ दिसणारी अशी लक्षणं दुर्लक्षित करू नका.

उल्टी आणि मळमळ

पोटात अल्सर झाल्यास किंवा पोटात गाठ झाल्यास रुग्णांना तीव्र प्रकारची मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. जर तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. बऱ्याचदा अशी लक्षणं गंभीर समस्या दर्शवतात.

पोटाच्या वरच्या भागात वेदना होणं

पोटाच्या अल्सरने ग्रस्त असलेल्या रुग्णांना पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवू शकतात. या वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकतात. जर तुम्हाला कोणत्याही समस्येशिवाय पोटदुखीच्या त्रास होत असेल तर या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

अतिप्रमाणात ढेकर येणं

पोटात अल्सर असल्यास किंवा पोटात गाठ निर्माण झाल्यास रुग्णाला खूप ढेकर येऊ लागतात. जर तुम्हाला जास्त ढेकर येण्याची समस्या असेल तर एकदा स्वतःची तपासणी करून घ्या. जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT