Morning Healthy Breakfast Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Healthy Breakfast : सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी बनवा प्रोटीनयुक्त मुगलेट्, पाहा रेसिपी

Healthy Breakfast : सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी महिलांना फार विचार करावा लागतो. त्यासोबतच नाश्ता चविष्ट देखील असायला हवा.

कोमल दामुद्रे

Moonglet Recipe : सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी महिलांना फार विचार करावा लागतो. त्यासोबतच नाश्ता चविष्ट देखील असायला हवा. त्यामुळे तुम्ही मूग डाळीपासून मुगलेट बनवू शकता. हा नाश्ता मुलांना नक्कीच आवडेल.

मुगलेट चविष्ट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. हा पदार्थ (Food) बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. त्यामुळे कार्यालयीन महिलांसाठीही (Women) हा पदार्थ बनवणे कठीण जाणार नाही. मुगलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. प्रथिने, कॅल्शियम, लोह यांचे भरपूर प्रमाण मुगलेट या अन्नपदार्थांमध्ये आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि स्नायूंना होणारा त्रासही कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया मुंगलेट्स ही चविष्ट रेसिपी बनवण्याची पद्धत.

1. साहित्य

  • मुग डाळ – दोन वाट्या

  • टोमॅटो (Tomato)– ½

  • बीटरूट – ½

  • सिमला मिरची – 2

  • हिरवी मिरची – ½

  • कांदा (onion) – 1

  • आले – 1 टीस्पून

  • हिरवी कोथिंबीर – ¼

  • बेकिंग सोडा – 1 टीस्पून

  • चाट मसाला – 1 टीस्पून

  • हळद – ½ टीस्पून

  • तेल – 4/5 चमचे

2. पद्धत

  • मुंगलेट्स बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मूग डाळ पूर्णपणे धुवून दोन तासांसाठी पाण्यात भिजत ठेवावी लागेल.

  • आता बीटरूट टोमॅटो आणि इतर भाज्या बारीक चिरून एका बाउलमध्ये ठेवा.

  • त्यानंतर मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता त्यात आल्याचे तुकडे आणि सोबत थोडे पाणी घाला.

  • मूग डाळ बारीक करून तयार केलेल्या पेस्टमध्ये हळद, बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  • आता एका वाटीत तयार केलेले मिश्रण घेऊन तव्याच्या मध्यभागी टाका आणि गोलाकार पसरवून घ्या.

  • आता थोडे शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला भाज्या ठेवा आणि नंतर चाट मसाला शिंपडा.

  • त्यानंतर रोल बनवून दोन्ही बाजूने गोल्डन झाल्यानंतर गॅस बंद करा. हे तयार मुंगलेट्स तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नालासोपा-यात मुख्य रस्त्यावरील उघड्या गटारात पडला पादचारी नागरिक

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

फक्त ‘अब्बा-अम्मा’ म्हणणाऱ्या बालकाला पोलिसांनी ९० मिनिटांत पोहोचवलं आई-वडिलांकडे

SCROLL FOR NEXT