Street shopping, interesting facts, Mumbai chor bazaar story, Mumbai Facts in Marathi, Mumbai Chor bazar Facts ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

जाणून घ्या, मुंबईच्या या ठिकाणाला चोर बाजार का म्हणतात

शॉपिंगच्या दृष्टीने प्रत्येक राज्यात प्रसिध्द असे अनेक बाजारपेठ आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महिला असो किंवा पुरूष शॉपिंगचा विचार आला की, आपण अशा काही मार्केटचा विचार करतो जिथे आपल्याला स्वस्त व कमी किंमतीत हवी ती वस्तू मिळेल. (Mumbai Facts in Marathi)

हे देखील पहा -

शॉपिंगच्या (Shopping) दृष्टीने प्रत्येक राज्यात प्रसिध्द असे अनेक बाजारपेठ आहे. त्यातील मुंबईतले चोर बाजार हे प्रसिध्द असून प्राचीनही आहे. या मार्केटमध्ये आपल्या हवी असणारी गोष्ट सहज मिळते. खाद्यपदार्थांपासून ते सौंदर्य उत्पादने, फर्निचर सर्व काही परवडणाऱ्या किमतीत सहज आपण खरेदी करू शकतो. याचे नाव थोडे विचित्र आहे परंतु, त्याला चोर बाजार का म्हटले जाते हे जाणून घेऊया.

इतिहास -

दक्षिण मुंबईतील मटन स्ट्रीट ग्रँट रोड जवळील भेंडी बाजार या ठिकाणी चोर बाजार आहे. मुंबईतील (Mumbai) ही बाजारपेठ खूप जुनी व इंग्रजांच्या काळापासून स्थित आहे. दीडशेपेक्षा अधिक काळापासून हा बाजार या ठिकाणी वसलेला आहे. सुरवातीच्या काळात या बाजारात जुन्या वस्तू विकल्या जायच्या परंतु, सध्याच्या काळात वापरलेल्या वस्तूंची विक्री अधिक केली जाते.

नावाचे नेमके रहस्य काय ?

चोर बाजार नाव ऐकल्यानंतर आपल्याला अनेक प्रश्न पडू लागतात. चोर बाजारात चोरीचा माल किंवा दुसऱ्याने वापरलेला माल सध्या विकला जातो. सुरुवातीच्या काळात आपला माल विकण्यासाठी किंवा ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यापारी जोरजोरात ओरडून आपला माल विकायचे तसेच खरेदी करण्यासाठी या ठिकाणी प्रचंड गर्दी असायची. या ठिकाणी अधिक प्रमाणात शोर असायचा त्यावेळी या बाजाराला शोर बाजार म्हणायचे. परंतु, इंग्रजांच्या राजवटीनंतर या बाजाराला चोर बाजार म्हटले जाऊ लागले.

या गोष्टी हमखास मिळतील

या बाजारात आपल्याला सेकंड हँड किंवा चोरीचा माल मिळतो. या बाजार आपल्याला हव्या त्या वस्तू सहज मिळतात. प्राचीन आणि पुरात्न वस्तू, झुंबर, लाकडी वस्तू, फर्निचर, ऑटोमोबाईल पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक आदी वस्तू आपल्याला सहज मिळतील या वस्तूंचा वापर करुन आपण आपल्या घराला हवा तसा नवीन लूक देऊ शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT