Benefits of eating egg yolk, Health Tips in Marathi, egg yolk benefits in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health Tips : अंड्यातील पिवळा भागाविषयी समज - गैरसमज

Benefits of egg : अंड्यातील पिवळा भाग खाण्याचे फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अंडे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे, हे आपल्याला बऱ्याचदा सांगितले जाते. वजन वाढवण्यासाठी ते व्यायाम करणाऱ्या प्रत्येकांच्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ ठरलेला आहे.

हे देखील पहा -

अंड्यापासून बरेच पदार्थ बनवले जातात. उकडलेलं अंड, ऑम्लेट, भुर्जी, ऑम्लेट राईस आदी पदार्थांचे (Food) सेवन आपण करतो. परंतु, काहीच्या मते अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. हे कितपत खरे खरं आहे ? अंडी खाण्याचे काय फायदे आहेत आणि काय काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊया. (Benefits of eating egg yolk)

अंड्याच्या आतील पिवळा आणि पांढरा दोन्ही भागाचे सेवन आपण करायला हवे. पांढऱ्या भागात ३ ग्रॅम प्रथिने असतात तर, पिवळ्या भागात ४ ग्रॅम प्रथिने असतात. याशिवाय अंड्यांमध्ये कॅरोटीनॉइड्स देखील असतात, त्यामुळे मोतीबिंदू व डोळ्यांचे (Eye) इतर आजार होण्यापासून आपल्याला वाचवू शकतात. अंड्यातील पांढऱ्या भागापेक्षा पिवळा भाग आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतो. अंड्यातील पिवळ्या भागात 'ड' जीवनसत्त्व (Vitamin) आढळून येते याचे सेवन केल्यास शरीरातील जीवनसत्त्वाची कमतरता भरुन निघण्यास मदत होते. (Egg yolk benefits in Marathi)

अंड्यातील पिवळ्या भागाचा फायदा कसा होतो

यकृतासाठी देखील फायदेशीर आहे

अंड्यातील पिवळ्या भागात कोलीन असल्यामुळे ते आपल्या यकृताचे कार्य सुधारण्यासाठी चांगले असते. इतकेच नाही तर अंड्यांमध्ये प्रथिने, फॅट आणि कॅलरीज भरपूर प्रमाणात असते. त्यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

अंड्यात कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणात असते. परंतु अंड्यांच्या पिवळा भागाचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही उलट ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटसारखे पदार्थ खाल्ल्याने वाढते. त्यामुळे रोज अंडी खा आणि शरीर निरोगी ठेवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT