PCOS cases saam tv
लाईफस्टाईल

पीसीओएसचा प्रकरणांमध्ये 50% टक्क्यांनी वाढ; 25 वर्षावरील महिलांसाठी तज्ज्ञांनी दिला सल्ला

PCOS cases : एका संशोधनानुसार, 24 ते 34 वयाच्या महिलांमध्ये 5 ते 10% स्त्रिया आणि 34 ते 44 वयोगटातील अंदाजे 25% महिलांना वंध्यत्वाची समस्या जाणवतेय.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे महिलांमध्ये अनेक समस्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये महिलांना गर्भाशय किंवा अंडायशाच्या समस्या जाणवत असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, 24 ते 34 वयाच्या महिलांमध्ये 5 ते 10% स्त्रिया आणि 34 ते 44 वयोगटातील अंदाजे 25% महिलांना वंध्यत्वाची समस्या जाणवत असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

अनेक महिलांना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) च्या लक्षणांची फारशी माहिती नसते. या समस्येमुळे मासिक पाळी अनियमित होणं, अनावश्यक केसांची वाढ, टाइप 2 मधुमेह, स्ट्रोक, लठ्ठपणा, हृदयविकार, रक्ताच्या गुठळ्या त्याचप्रमाणे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. पीसीओएसवर वेळीच उपचार न केल्यास वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो.

पुण्यातील नोव्हा आयव्ही फर्टिलिटीच्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. करिष्मा दहिफळे यांच्या सांगण्यानुसार, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ही एक सामान्य हार्मोनल स्थिती आहे. प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये ही अधिक प्रमाणात दिसून येते. यावेळी चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्त केस येणं, वजन वाढणं, अंडाशयातील सिस्ट, इन्सुलिन प्रतिरोधकता, तेलकट त्वचा आणि पुरळ तसंच वंध्यत्व ही या स्थितीची लक्षणं आहेत. काही अभ्यासानुसार, पीसीओएस हा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा एक प्रमुख घटक मानला जातो.

हेल्थ चेकअपकडे महिलांचं दुर्लक्ष

वयाच्या पंचविशीनंतर अनेक महिला नियमित हेल्थ चेकअपकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येण्याचा धोका वाढतो. बऱ्याचदा, अल्ट्रासाऊंड तपासणीत असं पाहायला मिळतं की, महिलांना पीसीओएस आहे, ही स्थिती त्यांना जाणवू शकत नाही कारण ते त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र ज्यावेळी या समस्येचं निदान होतं, तेव्हा उशीर झालेला असतो. पीसीओएस मासिक पाळी आणि ओव्हुलेशनमध्ये व्यत्यय आणतं. ही स्थिती हार्मोनल असंतुलन आणि अंडाशयांवर सिस्ट देखील निर्माण करतं. ज्यामुळे गर्भधारणेची प्रक्रिया गुंतागुंतीची होते, असंही डॉ. करिष्मा यांनी सांगितलं आहे.

पीसीओएसच्या प्रकरणांमध्ये होतेय वाढ

पीसीओएसचा प्रकरणांमध्ये 50% ची वाढ झाल्याचं दिसून आलंय. प्रौढ महिला नाही तर किशोरवयीन मुलींमध्ये देखील या समस्येत वाढ होते. पीसीओएस असलेल्या 80% स्त्रिया योग्य उपचाराने गर्भधारणा साध्य करू शकतात. 75% लठ्ठ स्थूल महिला आणि 25% सामान्य महिला पीसीओएसने ग्रस्त आहेत. जीवनशैली योग्य बदल केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गर्भधारणेपूर्वीच्या काळातील 50% स्त्रिया आणि गर्भधारणेनंतरच्या काळात 20% स्त्रियांमध्ये पीसीओएसची लक्षणं आढळतात. यासाठी लवकर निदान होणं गरजेचं आहे, असं डॉ. करिष्मा यांचं मत आहे.

का उद्भवते अशी परिस्थिती?

स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. प्रीथिका शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, तरुण स्त्रियांमध्ये पीसीओएस सारख्या समस्येला अनुवांशिकता, हार्मोनल असंतुलन आणि चुकीची जीवनशैली कारणीभूत असते. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि वाढलेला ताणतणाव यामुळे पीसीओएस सारखी समस्या उद्भवतात. 24 ते 34 वयोगटातील अंदाजे 5-10% स्त्रिया आणि 34-44 वयोगटातील सुमारे 25% महिला वंध्यत्वाचा सामना करतात. यावर वेळीच उपचार केले नाहीत की वंध्यत्वाची समस्या येते. सध्या पीसीओएसच्या घटनांमध्ये 5 ते 10 टक्के वाढ झाली असून उपचार न केलेल्या पीसीओएसमुळे वंधत्वाची समस्या उद्भवते. अशावेळी यशस्वी गर्भधारणेकरीता इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) ची मदत घ्यावी लागते.

PCOS असलेल्या तब्बल 80% महिलांना योग्य उपचारांमुळे गर्भधारणा शक्य झाली आहे. यामध्ये नियमित तपासण्यांमुळे पीसीओएस लवकर ओळखण्यात मदत होऊ शकते. पीसीओएस असलेल्या गर्भवती महिलांनी रक्तातील साखरेचं नियमित निरीक्षण करणं, योग्य वजन राखणं, संतुलित आहाराचं पालन करणं गरजेचं आहे, असंही डॉ. प्रीथिका शेट्टी यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT