Cars under 5 Lakh Saam Tv
लाईफस्टाईल

Cars under 5 Lakh : पाच लाखांच्या आत मिळतायेत 'या' भन्नाट कार; फीचर्सही दमदार

जर तुमचाही बजेट कमी असेल पण तुम्ही स्वतःसाठी नवीन कार घेण्याचा प्लान करत असाल तर...

कोमल दामुद्रे
Car

आपल्या प्रत्येकाची इच्छा (Dream) असते की, कधीतरी आपण देखील स्वत:ची कार घ्यावी. फिरायला जाताना किंवा गरजेच्यावेळी तिचा आपल्याला उपयोग होईल. कार घेणे खरेतर सोपे नाही परंतु भारतीय बाजारपेठेत ग्राहकांना परवडणाऱ्या वाहनांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत.

under 5 lakhs car

जर तुमचाही बजेट कमी असेल पण तुम्ही स्वतःसाठी नवीन कार घेण्याचा प्लान करत असाल तर आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या वाहनांची माहिती देणार आहोत. परंतु तुम्हाला या कार (Car) एक्स-शोरूम किंमतीसह 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतील.

Maruti Suzuki Alto 800

मारुती सुझुकीची ही कार या यादीतील सर्वात स्वस्त तर आहेच पण ती खूप परवडणारी देखील आहे. या मारुती कारची किंमत 3 लाख 39 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या कारमध्ये 800cc इंजिन देण्यात आले असून ही कार 22.5kmpl मायलेज देते.

Renault Kwid

५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला ही रेनॉल्ट कार देखील मिळेल जी बाजारात मारुती अल्टोला थेट टक्कर देते. या कारमध्ये 800 सीसी इंजिन देखील उपलब्ध आहे, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला ही कार 1000 सीसी इंजिनसह देखील मिळेल. या कारची सुरुवातीची किंमत 4 लाख 64 हजार 400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Maruti Suzuki Alto K10

मारुती सुझुकीच्या या कारनेही परवडणाऱ्या वाहनांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे, या कारची किंमत 3 लाख 99 हजार (एक्स-शोरूम) आहे. या कारमध्ये 1.0 लीटर इंजिन देण्यात आले असून या कारमध्ये तुम्हाला डिजिटल स्पीडोमीटर पाहायला मिळेल.

PMV EaS E

गेल्या महिन्यात, PMV इलेक्ट्रिकने ग्राहकांसाठी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. या कारची किंमत 4 लाख 79 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील

Maruti S Presso

तुम्हाला मारुती सुझुकीचे दुसरे मॉडेल ५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल. या कारमध्ये कंपनीने 998 cc चे इंजिन दिले आहे. या कारची किंमत 4 लाख 25 हजार रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. मारुती सुझुकीच्या या कारमध्ये तुम्हाला Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारख्या फीचर्सचाही सपोर्ट मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

SCROLL FOR NEXT