Facebook New Feature  Saam Tv
लाईफस्टाईल

Facebook : फेसबुकचं नवीन अपडेट! एकाचवेळी बनवता येणार चार वेगवेगळे प्रोफाईल

Facebook New Feature : एक नवीन अपडेट फेसबुकने युजर्ससाठी लाँच केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Facebook Multiple Profile Update

आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. सर्वजण इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय असतात. सर्वजण कोणत्या न कोणत्या सोशल मीडियाचा वापर करतात. युजर्ससाठी सोशल मीडियावर नेहमी नवनवीन अपडेट येत असतात. असाच एक नवीन अपडेट फेसबुकने युजर्ससाठी आणला आहे.

फेसबुक नेहमीच युजर्ससाठी नवीन अपडेट करत असतो. आता एक नवीन अपडेट लाँच केलं आहे. यात युजर्स एका वेळी अनेक प्रोफाईल तयार करु शकणार आहेत. याआधी फेसबुकवर फक्त एकच प्रोफाईल तयार करु शकत होते.

नवीन अपडेटसह सारखे लॉग इन करण्याची गरज नाही

फेसबुकने युजर्ससाठी मल्टिपल प्रोफाईल फिचर लाँच केले आहे. यामध्ये एकाच वेळी तुम्ही ४ प्रोफाईल बनवू शकता. हे फिचर इन्स्ट्राग्रामसारखे असणार आहे. इन्स्टाग्रामवरदेखील एकाच वेळी अनेक प्रोफाईल असण्याचा पर्याय आहे. विशेष म्हणजे, याआधी वेगवेगळे प्रोफाईल वापरण्यासाठी युजर्संना सारखे लॉग इन लॉग आउट करायला लागत होते. परंतु आता या फिचरमुळे ही समस्या दूर होणार आहे.

आता तुम्हाला फक्त जे प्रोफाईल वापरायचे आहे. त्यावर क्लिक करायचे आहे. त्यामुळे तुम्ही एकाच वेळी ४ अकाउंट लॉग इन करु शकता. फेसबुकच्या म्हणण्यानुसार, हे नवीन फिचर रोल आउट करण्यात आले आहे. काही युजर्संना हे अपडेट मिळाले असून येत्या काही काळात लोक याचा वापर करु शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT