How to Wash Your Face Saam tv
लाईफस्टाईल

Face Wash करताना या ४ चुका पडू शकतात भारी, होऊ शकते त्वचेला नुकसान; जाणून घ्या योग्य पद्धत

How to Wash Your Face : दिवसभर चेहऱ्यावर साचलेली घाण घालवण्यासाठी आपण त्याची अधिक काळजी देखील घेतो. काही जण त्वचेची काळजी घेण्यासाठी वारंवार चेहरा धुतात.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

सुंदर दिसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो चेहरा. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. बाहेरच्या धुळ, प्रदूषणांपासून आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

दिवसभर चेहऱ्यावर साचलेली घाण घालवण्यासाठी आपण त्याची अधिक काळजी देखील घेतो. काही जण त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी वारंवार चेहरा धुतात. त्यावर ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर देखील करतात. परंतु, जर तुम्ही योग्य प्रकारे चेहरा धुतला नाही तर त्वचेचे नुकसान होऊ शकते. फेस वॉश करताना आपण अशा काही चुका वारंवार करतो ज्यामुळे त्वचेचे नुकसान (Side effects) होते. जाणून घेऊया योग्य पद्धत.

1. त्वचेचा प्रकार

फेस वॉश करताना आपण त्वचेचा प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर त्याप्रमाणे फेसवॉश वापरा. तेलकट, संवेदनशील किंवा पुरळ येत असतील तर त्याप्रमाणे फेसवॉश वापरा.

2. मॉइश्चरायझरचा वापर

चेहरा धुतल्यानंतर अनेकांना मॉइश्चरायझरचा वापर केला जात नाही. ज्यामुळे त्वचेचे अधिक नुकसान होते. जर तुमच्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझरचा थर तयार झाला आणि चिकट वाटत असेल तर योग्य मॉइश्चरायझर वापरण्याची गरज आहे.

3. ओल्या वाइप्सचा वापर

बरेच लोक चेहरा धुण्यापूर्वी किंवा नंतर ओल्या वाइप्सचा वापर करतात. जे त्वचेसाठी हानिकारक आहे. ओल्या वाइप्समध्ये अल्कोहोल असते. ज्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यातील रसायने चेहऱ्याचे छिद्र बंद करतात ज्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवते.

4. चेहरा सतत घासणे

अनेकांना सवय असते की, चेहरा धुताना ते अधिक जोराने घासतात. यामुळे चेहऱ्याला नुकसान होते. चेहऱ्यावर लालसरपणा, सूज येऊ शकते. त्यासाठी चेहरा नेहमी हलक्या हाताने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Weather Update: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT