Eye Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Eye Care Tips : उन्हाळ्यात वाढतोय डोळ्यांचा आजार, कशी घ्याल काळजी ? डॉक्टारांनी दिली धोक्याची घंटा !

Eye Problem : वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरपेक्षा डोळ्यांवर त्रास अधिक होताना दिसून येतोय.

डॉ. माधव सावरगावे

Summer Eye Care Tips : वातावरण बदलले की, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. सध्या उन्हाळ्यात तापमानाचा पार ४४ अंशाच्या वर गेला आहे. यासाठी डॉक्टरांनी आपल्याला खबरदारी घेण्यास सांगितली आहे. अशातच उन्हाच्या फटक्यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागते आहे.

वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरपेक्षा डोळ्यांवर त्रास अधिक होताना दिसून येतोय. अनेकांचे डोळे (Eye) लाल होणे, डोळ्यांना जळजळ होणे, डोळ्यांची आग होणे इत्यादी विकारांचा सामना करावा लागतो आहे.

वाढत्या स्क्रीन टाइमचाही डोळ्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे डोळ्यांच्या दवाखान्यात नेत्ररुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यात मुख्यतः घराबाहेर पडणारी युवा मुले-मुली यांची संख्या वयोवृद्ध रुग्णांपेक्षा जास्त आहे. दर दहा रुग्णांमागे तीन ते चार रुग्ण उष्णतेमुळे डोळ्यांच्या समस्या घेऊन येत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ सांगतात.

डॉ. महेश पाठक, नेत्ररोगतज्ज्ञ यांनी सांगितले की, टीव्ही, कम्प्युटर (Computer), मोबाइलचा जास्त वापर केल्याने डोळे कोरडे होतात. डोळ्यांची आग होते, डोळे सतत टोचतात, डोळ्यांना खाज येते तसेच डोळ्यांतून पाणी येते अशावेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1. डोळ्यांच्या आजारांपासून वाचण्यासाठी कशी घ्याल काळजी

  • दर २० मिनिटांनी, कम्प्युटर स्क्रीनपासून दूर राहा तसेच २० वेळा पापण्यांची उघडझाप करा

  • स्क्रीन डोळ्यांच्या उंचीच्या खाली ४ ते ५ इंच असावी. कम्प्युटर स्क्रीनपासून डोळ्यांचे अंतर २२ ते २८ इंच ठेवा.

  • मॉनिटर स्क्रीनवर अँटीरिफ्लेक्टर स्क्रीन लावणे जास्त चांगले असेल.

  • उन्हाळ्यात घराबाहेर पडताना टोपी किंवा रुमाल, स्कार्फ व सनग्लासचा वापर करावा.

  • पुरेसे पाणी प्यावे, परिपूर्ण आहार घ्यावा. पाणीदार फले खावी.

  • डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा टिकावा ठेवावा. व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचे सेवन करावे जसे की हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपई.

  • डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या सनग्लासेसचा उपयोग करा.

  • वेळीच काळजी न घेतल्यास मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताखालील जांबाची वाडी धोक्यात, जमिनीला पडू लागल्या भेगा

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Raj Thackeray: १२ वर्षात तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! २०३० - ३१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येणार ६,००० रुपये

SCROLL FOR NEXT