Ev scooters range 100 km above Saam Tv
लाईफस्टाईल

Electric Scooter: एका चार्जमध्ये धावणार 100 Km, जबरदस्त आहेत 'या' इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा लिस्ट

Satish Kengar

Ev scooters Range 100 Km Above:

इलेक्ट्रिक स्कूटर्सची सध्या भारतीय बाजारात खूप मागणी वाढली आहे. यातच लोकांना ज्यांची ड्रायव्हिंग रेंज 100 किलोमीटरपेक्षा जास्त असते, अशा इलेक्ट्रिक स्कूटर जास्त आवडतात. सुरक्षेसाठी या स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक दिले जातात. या नवीन जनरेशन फ्युचरिस्टिक स्कूटर आहेत. यामध्ये डिजिटल डिस्प्लेसह आरामदायी प्रवासासाठी हेवी सस्पेंशन ग्राहकांना मिळतं. अशाच काही स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Ola S1 Pro

या स्कूटरची किंमत 1.47 लाख रुपये आहे. ही स्कूटर एका चार्जवर 181 किमी रेंज देते. यात 12 रंगांचे पर्याय आहेत. स्कूटरमध्ये एलईडी लाइट, 7 इंच टच स्क्रीन टीएफटी डिस्प्ले आहे. स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि वायफाय सारखे फीचर्स आहेत. यात साइड-स्टँड डाउन, अँटी-थेफ्ट अलर्ट, जिओ-फेन्सिंग आणि रिव्हर्स मोड आहे. स्कूटरमध्ये 5.5 kW आणि 8.5 kW क्षमतेचा बॅटरी पॅक आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ather 450X

या जबरदस्त EV स्कूटरमध्ये 3.7 kWh बॅटरी आहे. यात 7-इंचाचा टचस्क्रीन कन्सोल आहे. यात स्मार्टइको, इको, राइड, स्पोर्ट आणि Warp असे पाच मोड आहेत. या स्कूटरची किंमत 98079 हजार रुपये आहे. ही स्कूटर साडेचार तासांत चार्ज होते. याची रेंज 150 किमी आहे. (Latest Marathi News)

Hero Electric Optima

हीरो स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 135 किमी पर्यंत धावते. स्कूटरचे एकूण वजन 102 किलो आहे. स्कूटर रस्त्यावर 55 किमी/तासचा टॉप स्पीड देते. स्कूटरमध्ये 1200 पॉवरची मोटर आहे. यामध्ये दोन व्हेरियंट ऑफर केले जात आहेत. ही स्कूटर 67190 हजार रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

BattRE Electric Storie

या EV स्कूटरची प्रारंभिक किंमत 89600 हजार रुपये आहे. ही स्कूटर 3.1 kWh बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे. यात इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखी फीचर्स आहेत. ही स्कूटर एका चार्जवर 132 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. यात 3.1 क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. या पॉवरफुल स्कूटरमध्ये पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यात ट्यूबलेस टायर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT