Mental Health Saam Tv
लाईफस्टाईल

Mental Health : तुमच्या डोक्यात सतत विचार सुरु असतात ? याप्रकारे करा तुमच्या मनाला शांत

How To Care Mental Health : घरातल्या किंवा ऑफिसमधल्या अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्याला कोणतेच उत्तर मिळत नाही.

कोमल दामुद्रे

Mental Health Disorders : आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे आपण अधिक त्रस्त होतो. ज्यामुळे त्याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो. घरातल्या किंवा ऑफिसमधल्या अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्याला कोणतेच उत्तर मिळत नाही. त्यामुळे आपण अधिक चिडचिडे, रागीष्ट होतो.

यामुळे आपले मन अधिक अस्वस्थ होते. यामुळे लोक चिंताग्रस्त व नैराश्याचे बळी पडतात. शारीरिकदृष्ट्या जितके निरोगी असणे चांगले तितकेच मानसिकदृष्ट्या देखील निरोगी असायला हवे. तुमचे मन काही गोष्टींमुळे अस्वस्थ असेल किंवा काही कारणांमुळे डोक्यात सतत विचार सुरु असतील तर यावर मात कशी कराल हे जाणून घेऊया.

1. मेडिटेशन

टेन्शन (Tension) फ्री राहण्यासाठी मेडिटेशन तुम्हाला खूप मदत करू शकते. जेव्हा मनात काही विचार येत असतील तेव्हा शांत ठिकाणी बसा व थोड्या वेळासाठी ध्यान करा. या दरम्यान कोणत्याही प्रकारचे विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका. सुरुवातीला काही प्रमाणात अडचणी येतील परंतु, हळूहळू सवय झाल्यानंतर त्याचे फायदे (Benefits) देखील मिळतील.

2. चांगली झोप

संपूर्ण आरोग्य (Health) निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी आणि शांत झोप आवश्यक आहे. याउलट जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर मूड खराब होऊ शकतो आणि विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे जर तुम्हाला तुमचे मन शांत ठेवायचे असेल तर 7-8 तासांची झोप घ्या.

3. मल्टीटास्किंगची सवय नकोच

स्वतःला सर्वोत्कृष्ट सिद्ध करण्याच्या नादात आपण अनेकदा स्वत:सोबत सक्तीने वागतो. त्यामुळे आपण एकाच वेळी अनेक कामे हाताळत बसतो. मल्टीटास्किंगच्या या सवयीचा आपल्या मनावर परिणाम होऊ लागतो. मल्टीटास्किंग ही एक उत्तम गोष्ट आहे, परंतु मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. म्हणून एकाच वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT