Child care tips, Health tips, Highly Processed Foods, Processed Foods To Avoid, Healthy Eating Tips For Kids ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

प्रक्रिया केलेल अन्नपदार्थ मुलांनी खाल्यास होऊ शकते नुकसान

आपण मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत अधिक सर्तक असतो.

कोमल दामुद्रे

मुंबई : आपण मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत अधिक सर्तक असतो. त्यांच्या आहारात कोणते पदार्थ असायला हवे याविषयी पालक अधिक सक्रीय असतात.

हे देखील पहा -

चांगल्या आरोग्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. खरे तर प्रत्येकाने सकस आहार घेणे आवश्यक आहे. पण मुलांसाठी त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. कारण या टप्प्यावर मुलांची वाढ होत असते, त्यामुळे प्रत्येक खाद्यपदार्थ त्यांच्या वाढीवर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम करत असतो. तसेच मुलं त्याच्या आहाराबाबत खूप निष्काळजी असतात. त्यांना घरच्या पदार्थांपेक्षा जंक फूड खाण्याची अधिक आवड असते. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कोणते पदार्थ मुलांनी प्रमाणात खावे किंवा टाळावे हे जाणून घेऊया. (Highly Processed Foods To Avoid)

१. पॅकबंद आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने यासारख्या पोषक तत्वांचा पुरेसा अभाव असतो. त्यामुळे ते चवीला चांगले असले तरी त्याचे सेवन केल्यास मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने पोट भरलेले राहाते त्यातून कोणतेच पोषक तत्व मिळत नाही.

२. या पदार्थांमध्ये उष्मांकांची संख्या जास्त असते. त्यामुळे शरीरात कॅलरीजची संख्या वाढते परंतु या कॅलरीजचा मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर नसतात. ज्यामुळे मुलांना लठ्ठपणा येऊ शकतो. लठ्ठपणाची ही समस्या मुलांच्या इतर अनेक आरोग्य समस्यांचे (Problems) कारण बनू शकते.

३. जंक फूडमध्ये सोडियमची कमतरता असते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठ व सोडियमचे प्रमाण जास्त असते जे मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे मुलांना उच्च रक्तदाब किंवा किडनीशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी होण्याची शक्यता असते.

४. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ मुलांच्या तोंडाच्या आरोग्यावर जास्त परिणाम करतात. बटाट्याच्या चिप्स, बन्स, कुकीज, बिस्किटे आणि पॅकबंद आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट आढळतात. जे मुलांच्या (Child) दातांना चिकटतात आणि दात किडतात. त्यामुळे दात दुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (Unhealthy Junk Foods)

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

SCROLL FOR NEXT