Earth's Rotation Viral Video Saam TV
लाईफस्टाईल

Earth's Rotation Viral Video : पृथ्वी जमिनीवरून फिरताना पाहिली आहे का? डोळ्यांचं पारणं फेडणारा VIDEO व्हायरल

Ruchika Jadhav

योगेश गायकवाड, साम टीव्ही

पृथ्वी ही स्वतः भोवती फिरत असते. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 लागतात आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी तिला 365 दिवस लागतात. पण पृथ्वी ही फिरताना किंवा प्रदक्षिणा करताना तुम्ही कधी पाहिली आहे का? पृथ्वी कशी फिरते, तिचा वेग किती असतो, ती फिरताना भूगर्भात काही हालचाली होतात का?, किंवा त्याचा परिणाम पृथ्वी तळावरील जीवसृष्टीवर परिणाम होतो का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील.

अशात आता जमिनीवरून पृथ्वी कशी फिरते याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स टाकत आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हालाही काहीतरी अद्भुत पाहिल्यासारखे वाटेल.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. आजवर NASA च्या माध्यमातून अंतराळातील देखील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण या व्हिडीओतून तुम्ही पृथ्वीरूनच पृथ्वी कशी फिरते याचं अनोखं दृश्य तुम्ही पाहू शकता.

मार्टीन नावाच्या व्यक्ती ने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तसेच सोशल मीडियावर प्रसारित केलाय. तुम्ही पाहू शकता की 360 डिग्री मध्ये पृथ्वी कशी फिरते आहे. या मध्ये पृथ्वीच्या रोटेशनचा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. या व्हिडिओ मध्ये आकाश गंगा ही लपलेली दिसते आहे. तर तारे अस्थिर दिसत आहेत.

डोंगर,पठारे हे 360 डिग्री मध्ये फिरताना दिसत आहे. यामध्ये आकाशातील रंग अतिशय सुंदर आणि तपकीरी रंगाचे दिसत आहे. तसेच पृथ्वीवर वाहनांची अथवा विविध गोष्टींची वाहतूक सुरु असून ते लहान लाईट्स सारखे चमचमताना दिसते आहे. @wonderofscience नावाच्या पेजने हा व्हिडीओ शेअर केलाय. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ बद्दल अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT