Dry Skin Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Dry Skin Remedies : कोरड्या त्वचेमुळे चेहरा खराब दिसतोय? आहारात करा या सूपरफूडचा समावेश

Summer Skin Care : उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला आरोग्याच्या अधिक समस्या उद्भवतात. कडक उन्हाचा आपल्या त्वचेवर अधिक परिणाम होतो. ऋतू कोणताही असला तरी कोरडी त्वचा अनेकदा चेहऱ्याची चमक हिरावून घेते. यासाठी चेहऱ्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला आरोग्याच्या अधिक समस्या उद्भवतात. कडक उन्हाचा आपल्या त्वचेवर अधिक परिणाम होतो. ऋतू कोणताही असला तरी कोरडी त्वचा अनेकदा चेहऱ्याची चमक हिरावून घेते. यासाठी चेहऱ्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

त्वचेला (Skin) आतून आणि बाहेरुन संरक्षण देणे गरजेचे आहे. त्वचेसाठी आपण अधिक केमिकल उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे त्वचेला नुकसान होते. अशावेळी तुम्ही आहारात काही महत्त्वाचे बदल करुन त्वचा सुधारु शकता. जर कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल तर आहारात (Diet) या सुपरफूडचा समावेश करा.

1. अॅव्होकॅडो

आरोग्यासाठी अधिक समृद्ध असलेले फळ अॅव्होकॅडो आहे. हे त्वचेला हायड्रेट ठेवते. यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स त्वचेची आर्द्रता कमी करते. यात असणारे व्हिटॅमिन (Vitamins) ई त्वचा चमकदार बनवते.

2. रताळे

बीटा-कॅरेटीन समृद्ध रताळे त्वचेला हायड्रेट ठेवते. बीटा कॅरेटीनचे व्हिटॅमिन ए मध्ये रुपातंर करते. जे त्वचेच्या पेशींना मऊ होण्यास मदत करते.

3. तूप

तूप खाल्ल्याने तुमची त्वचा हायड्रेट ठेवू शकता. हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट तुपात आढळतात. ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते.

4. सॅल्मन

सॅल्मन फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळते. जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेल नैसर्गिक घटक त्वचेची आर्द्रता कमी करते.

5. नारळ

खोबऱ्याचे तेल असो किंवा नारळ पाणी दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. नारळाचे तेल त्वचेचे आतून संरक्षण करते. तर नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात जे त्वचेला हायड्रेट ठेवतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT