Oral health problems SAAM TV
लाईफस्टाईल

Oral health problems: सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडतंय? वेळीच व्हा सावध, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण

Best home remedies for dry mouth problem: सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडणं ही सामान्य समस्या वाटली तरी ती गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. ड्राय माउथची कारणं, लक्षणं आणि सोपे उपाय जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडणं किंवा घसा सुकल्यासारखा वाटणं ही अनेकांना जाणवणारी बाब आहे. पण ही सामान्य वाटणारी गोष्ट नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होत असेल किंवा तोंडात लाळ तयारच होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला 'ड्राय माउथ' किंवा 'जेरोस्टोमिया' असं म्हटलं जातं.

ड्राय माउथची प्रमुख लक्षणं

तोंड सतत कोरडं किंवा चिकट वाटणं, काही खाताना चावणं किंवा गिळणं कठीण जाणं, बोलताना त्रास होणं ही याची सुरुवातीची लक्षणं आहेत.

इतर लक्षणं कोणती?

  • घशात कायम खवखव राहणं

  • रात्री वारंवार तहान लागणं

  • तोंडाला दुर्गंधी येणं

  • ओठ फुटणं

  • तोंडाच्या कोपऱ्यांवर जखमा होणं

काय कारणं असू शकतात?

ड्राय माउथ होण्यामागे सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असणं म्हणजेच डिहायड्रेशन. झोपण्यापूर्वी पुरेसं पाणी न पिणं यामुळे लाळ कमी प्रमाणात तयार होते. त्याचबरोबर नाक बंद असल्यामुळे काही लोक झोपेत तोंडाने श्वास घेतात. अशावेळी सकाळी तोंड कोरडं पडण्याचा धोका असतो.

काही विशिष्ट औषधांच्या सेवनामुळेही ही समस्या उद्भवू शकते. याशिवाय मधुमेह किंवा ऑटोइम्यून आजारांसारख्या आजारांमुळेही ड्राय माउथचा धोका वाढतो. वय वाढत गेल्यानंतर लाळ तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. तसंच झोपेत घोरणं किंवा स्लीप एप्निया सारख्या श्वासासंबंधी अडचणीही यामागचं कारण असू शकतात.

या समस्येमुळे काय त्रास होऊ शकतो?

तोंड सतत कोरडं राहिल्याने दात कमजोर होऊ शकतात आणि पडण्याचा धोका वाढतो. हिरड्यांच्या समस्या, सतत तोंड येणं, इन्फेक्शन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय तोंडाची चव बदलते आणि अन्न पचण्यातही अडचणी येऊ शकतात.

हा त्रास होत असल्यास काय कराल?

या समस्येपासून त्रास होऊ नये म्हणून दिवसातून पुरेसं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः रात्री झोपताना जवळ पाण्याची बाटली ठेवणं उपयोगी ठरू शकतं. कॅफेन आणि अल्कोहोलचं प्रमाण कमी ठेवावं. याच्या सेवनामुळे डिहायड्रेशन वाढतं.

तोंडाची स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. नियमित ब्रश आणि फ्लॉस करणं तसंच अल्कोहोल-फ्री माउथवॉश वापरणं फायदेशीर ठरतं. जर एखाद्या औषधामुळे ही समस्या होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: राजूर हत्याकांड प्रकरण; दोन पोलीस निरीक्षकांच निलंबन

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी? तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

Akkalkot : अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेलाय? मग न विसरता फिरा 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स

Cabinet Expansion: मोदी सरकारमध्ये मोठा उलटफेर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार

SCROLL FOR NEXT