Drinking Water Before Brushing In The Morning
Drinking Water Before Brushing In The Morning  Saam Tv
लाईफस्टाईल

Drinking Water Before Brushing In The Morning : सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे, फक्त ही चूक करू नका!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Drinking Water Before Brushing : आरोग्य निरोगी राहण्यासाठी माणसाला नियमित मुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यासाठी रोज दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक असते. आपल्या शरीरात 70 ते 75 टक्के पाणी असते.

यामुळे जास्त पाणी पिल्याने गंभीर आजारापासून दूर राहण्यास मदत होईल. तसेच जर तुम्ही सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन आरोग्याला (Health) अनेक फायदे मिळवू शकता. जपानी लोक रोज सकाळी उठल्यानंतर लगेच दात न खास्ता ग्लासभर पाणी पितात.

लाळेत बॅक्टेरिया असल्याने सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वी पाणी (Water) न पिण्याचे अनेकांचे मत असते. पण सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता. चला तर मग आरोग्याला होणारे फायदे पाहूया!

त्वचा फ्रेश राहील -

त्वचेवरील विषारी आणि मृत पेशी काढून टाकण्यात मदत होते. सकाळी ब्रश न करता पाणी पिल्याने त्वचेच्या टोन मध्ये फ्रेशनेस वाढतो. शरीरात नवीन आणि ताजे पेशी वाढवण्यास मदत मिळते.

वजन कमी होण्यास मदत होईल -

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हा उपाय करून वजन कमी करू शकता. जेव्हा तुम्ही सकाळी पाणी पिता तेव्हा तुमचे चयापचय वेगाने होते परिणामी जलद पचन होते. शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. सकाळी ब्रश न करता पाणी पिल्याने वजन कमी होऊ शकते.

अनेक समस्यांवर रामबाण उपाय -

सकाळी ब्रश न करता पाणी पिल्याने उच्च रक्तदाब सारख्या समस्या कमी करण्यास मदत मिळते आणि दिवसभर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. रात्रीच्या वेळेस तोंडात असलेले जंतू आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी पिता, तेव्हा तुमच्या शरीरात बॅक्टेरिया प्रवेश करतात परिणामी रोगप्रतिकारशक्ती वाढते.

ही चूक करू नका -

सकाळी उठून ब्रश न करता पाणी प्यायले तरी तोंडाची स्वच्छता राखणे महत्त्वाचे असते त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केला पाहिजे. सकाळी उठल्यावर जास्त पाणी पिऊ नका असे केल्यास इतर समस्या उद्भवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

Dhananjay Munde Speech Beed | धनंजय भाऊंनी सभा गाजवली!

Tanaji Sawant | तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Effects of Eating Stale Rice: शिळा भात आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक?

SCROLL FOR NEXT