Morning Drinks
Morning Drinks Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Drinks : रोज सकाळी 'हे' ड्रिंक्स प्या, शरीराला डिटॉक्स करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Morning Detox Drinks : सणासुदीच्या काळात इच्छा नसतानाही तळलेले, मसालेदार, गोड पदार्थ आपण खातो. आणि दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो, त्यामुळे रोज घरात काही ना काही बनवलं जातं. हे पदार्थ खाण्यात खूप मजा येते, पण पोटाची अवस्था बिकट होते. जास्त तेलकट, मसालेदार आणि साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा तर वाढतोच शिवाय गॅस (Gas), अॅसिडिटीच्या समस्याही उद्भवतात. त्यामुळे सणावारात (Festivals) जास्त खाण्याचा आनंदही तुम्ही घेतला असेल तर आता शरीराच्या आतली घाण काढून टाकण्याची वेळ आली आहे ज्यासाठी हे ड्रिंक्स खूप फायदेशीर आहेत.

१. लिंबू, पुदीना आणि काकडीचे डिटॉक्स पेय

साहित्य - ३ लीटर पाणी, १/२ काकडी, २ लिंबू, चिरलेली १०-१२ पुदिन्याची पानं

कसे बनवावे -

- सर्व गोष्टी एका मोठ्या जगमध्ये ठेवा.

- रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. ज्यामुळे पाण्यात या सर्व गोष्टींचा स्वाद येईल आणि त्यांचे फायदेही मिळतील.

- सकाळी गाळून प्यावे.

२. मध, लिंबू आणि आल्याचा चहा

साहित्य : १ इंच ताजे आले, १ कप पाणी (उकळणे), १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध

कसे बनवावे -

- आले घ्या आणि ते बारीक करून घ्या.

- त्यात एक कप उकळते पाणी घाला आणि ते दोन मिनिटे असेच राहू द्या.

- एका कपमध्ये लिंबाचा रस आणि मध घाला.

- हे चांगले मिसळा जेणेकरून मध विरघळेल.

- आता, आले पाणी मगमध्ये गाळून टाका.

- गरम प्या.

३. बीट आणि डाळिंबाचे डिटॉक्स पेय

साहित्य : १ कप सोललेले बीट, १ डाळिंब, २ कप ग्रीन टी, हवे तसे लिंबाचा रस, १ चमचा किसलेले आले

कसे बनवावे -

- सर्व साहित्य घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

- त्यात लिंबाचा रस पिळून घाला.

- आता ते गाळून प्या. तसे ते फिल्टर न करताही प्यायले जाऊ शकते, यामुळे शरीराला चांगल्या प्रमाणात फायबर मिळेल.

४. आले - हळद हर्बल चहा

साहित्य : २ कप पाणी, अर्धा चमचा हळद पावडर, १ चमचा ताजे आले चिरून, दीड चमचा ग्राउंड दालचिनी, १ चमचा मध, १ लिंबू

कसे बनवावे -

- पॅनमध्ये पाणी उकळवा.

- त्यात हळद, आलं आणि दालचिनी घालावी.

- गॅस मंद आचेवर ठेवा आणि १० मिनिटे शिजू द्या.

- हा चहा एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि थंड झाल्यावर त्यात मध घाला. मिसळा आणि प्या.

५. मेथी पाणी

- काही मेथीचे दाणे घ्या आणि ते तव्यावर भाजून घ्यावेत.

- आता ते बारीक करून पावडर तयार करा.

- एक चमचा पावडर घ्या आणि सकाळी किंवा झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने प्या.

त्यामुळे सहज तयार होणाऱ्या या ड्रिंक्सचं सेवन करून शरीर स्वच्छ करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT