Detox Drinks Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Health Care : हिवाळ्यात रिकाम्या पोटी प्या 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स,नेहमी निरोगी राहाल!

Detox Drink: सकाळी रिकाम्या पोटी जर आपण योग्य तो आहार घेतला तर आरोग्यासाठी चांगले असते.

कोमल दामुद्रे

Winter Health Care : सकाळी उठल्यावर आपल्यापैकी बरेचजण चहा पितात तर काही कॉफी घेण्याची सवयी असते परंतु, याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी जर आपण योग्य तो आहार घेतला तर आरोग्यासाठी चांगले असते. सकाळी नाश्ता करण्याअगोदर डिटॉक्स ड्रिंक्सचे सेवन केले पाहिजे त्यामुळे तुम्ही कायम हेल्दी राहता.

काही लोक डिटॉक्स ड्रिंक्स मध्ये लिंबु पाणी (Water) घेतात परंतु तुम्ही हेल्थनुसार आणि ऋतू नुसार डिटॉक्स ड्रिंक्स तयार केल्या पाहिजे तर चला माहिती करून घेऊ काही अशा डिटॉक्स ड्रिंक्स ज्या हिवाळ्यात घेतल्या पाहिजेत.

1. कोरड्या त्वचेसाठी डिटॉक्स ड्रिंक्स

थंडीत त्वचा कोरडी पडते त्यामुळे सकाळी गाजर आणि संत्रीचा रस घेतला पाहिजे रिकाम्यापोटी ही ड्रिंक घेतल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो. नुसते गाजर जरी खाला तरी फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन A(vitamin)चे प्रमाण खूप जास्त असते. ज्यांना शुगरचा (Sugar) त्रास आहे त्यांनी चुकूनही रिकाम्या पोटी डिटॉक्स ड्रिंक्स घेऊ नये.

Detox Drink

2. हृदयासाठी डिटॉक्स ड्रिंक्स

हिवाळ्यात लोकांना हार्टअटॅकच्या (Heart-attack) समस्या अधिक प्रमाणत होते.अश्या वेळेस डाळिंब आणि बीटरूटचे डिटॉक्स ड्रिंक्स तयार करून घेऊन शकता.यात व्हिटॅमिन A चे प्रमाण असते जी तुमची इम्यूनिटी सिस्टम बूस्ट करते.

3. लिव्हरसाठी डिटॉक्स ड्रिंक्स

जर तुम्हाला लिव्हरच्या संबधित काही समस्या असतील तर सकाळी रिकाम्या पोटी नारळपाणी घेतले पाहिजे त्यात थोडासा लिंबूचा रस टाकून डिटॉक्स ड्रिंक्स म्हणून घेऊ शकता. नारळपाणी मध्ये पोटॅशियम आणि ओमेगा-३ असते जे तुमच्या आरोग्यासाठी चागले असते. जर तुम्हाला बीपी, pcod च्या समस्या असतील तर त्यासाठी ही योग्य डिटॉक्स ड्रिंक्स आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

SCROLL FOR NEXT