Ashadhi Ekadashi 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा आयुष्यभर सापडाल संकटात

Devshayani Ekadashi: या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. देवशयनी एकादशी नंतर भगवान निद्रावस्तेत जातात.

कोमल दामुद्रे

Do's and Don'ts on Ashadhi Ekadashi: आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. देवशयनी एकादशी नंतर भगवान निद्रावस्तेत जातात.

आषाढी एकादशीनंतर चातुर्मास सुरु होतो. या वर्षी देवशयनी एकादशी 29 जून 2023 रोजी साजरी केली जाईल. एकादशीला भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. या दिवशी अनेक कामे करण्यास मनाई आहे. आज आम्ही तुम्हाला देवशयनी एकादशीचे व्रत करायचे असल्यास कोणत्या गोष्टी टाळायला हव्या हे जाणून घेऊया.

1. या चुका करु नका

  • या दिवशी मासांहर करु नये तसेच कांदा लसूण व नशेपासून दूर राहावे.

  • एकादशीला (Ashadhi Ekadashi) भात खाणे वर्ज्य मानले जाते. पोहे, पुलाव यापासून बनवलेल्या वस्तू या दिवशी खाऊ नयेत. उपवास (Upvas) न ठेवणाऱ्यांनीही भात खाणे टाळावे.

  • देवशयनी एकादशीला ब्रह्मचर्य पाळावे. या दिवशी भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन मंत्रांचा जप करावा.

  • देवशयनी एकादशीला कोणाच्याही मनात वाईट विचार आणू नयेत. या दिवशी कोणाविषयी वाईट बोलू नये.

  • तुळशीला (Tulsi) जल अर्पण करू नये. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये. या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT