Dried Lipstick saam tv
लाईफस्टाईल

Dried Lipstick: जुनी-सुकलेली लिपस्टिक कचऱ्यात फेकताय? टाकून देण्यापूर्वी पाहा री-युज करण्याची स्मार्ट टीप्स

Reuse Old And Dried Lipstick: सुकलेली किंवा जुनी लिपस्टिक फेकू नका. खोबरेल तेल, गरम पाणी आणि एलोवेरा जेलच्या मदतीने लिपस्टिक पुन्हा कशी वापरता येईल, याबद्दल सोप्या आणि घरगुती टिप्स जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. यामुळे महिलांना मेकअप करायला देखील आवडतो. त्यापैकी एक म्हणजे लिपस्टिक, जी तुम्हाला प्रत्येक मुलीच्या बॅगेत तुम्हाला दिसेल. ती लावल्याने चेहऱ्याचा लूक वेगळाच दितो. ऑफिसला जाताना असो किंवा एखाद्या कार्यक्रमात ओठांच्या परफेक्ट लूकसाठी लिपस्टिक वापरली जाते.

लिपस्टिकचे इतके शेड असतात की कोणता उठून दिसेल हा प्रश्न नेहमी असतो. काही महिलांना जाणवणारी तक्रार म्हणजे लिपस्टिक तशीच ठेवली तर ती बहुतेकवेळा सुकून जाते. त्यामुळे महिला ती फेकून देतात आणि पैसेही वाया जातात. आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्यामुळे लिपस्टिक फेकावी लागणार नाही.

जुनी-सुकलेली लिपस्टिक करा री-युज

खोबरेल तेल

बहुतेक मुली तक्रार करतात की, लिपस्टिक ठेऊन दिल्यानंतर जुनी आणि सुकून जाते. ज्यामुळे ती फेकून द्यावी लागते. जर तुम्हाला ही समस्या सोडवायची असेल, तर तुम्ही सुकलेल्या लिपस्टिकमध्ये खोबरेल तेल घालून ती पुन्हा वापरू शकता.

गरम पाणी

जर तुम्हाला वाळलेल्या लिपस्टिकचा पुन्हा वापर करायचा असेल तर तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. फक्त एक वाटी घ्या आणि त्यात लिपस्टिक ३-४ मिनिटं भिजवा. ही पद्धत सर्वात सोपी आहे आणि समस्येपासून लवकर सुटका मिळवण्यासाठी ती वापरली जाऊ शकते.

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्हाला सुकलेल्या लिपस्टिकचा पुन्हा वापर करायचा असेल तर तुम्ही ती बारीक करून तुमच्या लिपस्टिकमध्ये वापरू शकता. असं केल्याने तुमच्या ओठांना नुकसान होणार नाही.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT