Bluetooth Hacking : तुम्ही सुद्धा Bluetooth ऑन ठेवताय? पण ही चूक पडू शकते महागात , तुमचा फोन होऊ शकतो हॅक  meta ai
लाईफस्टाईल

Bluetooth Hacking : तुम्ही सुद्धा Bluetooth ऑन ठेवताय? पण ही चूक पडू शकते महागात , तुमचा फोन होऊ शकतो हॅक

Bluetooth Security : सर्वच लोक Bluetooth चा वापर सरार्सपणे करतात. पण याच Bluetooth मुळे फोन हॅक करता येतो, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. मात्र नेमका धोका कुठे आहे आणि फोन कसा सुरक्षित ठेवायचा, जाणून घ्या.

Saam Tv

Bluetooth सतत ऑन ठेवताय मग जरा सावध! वायरलेस इअरफोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत अनेक गॅझेट्ससाठी आपण Bluetooth चा वापर नेहमी करतो . Bluetooth ऑन,हेडफोन कनेक्ट आणि कानात वाजणारी गाणी यानेच तर आपला दिवस सुरू होतो. ते पार दिवस संपेपर्यंत Bluetooth कायम ऑन असतो. पण याच Bluetooth मुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो. होय, सध्या सोशल मीडियावर याबाबत अनेक दावे केले जात आहेत. खरंच Bluetooth ऑन ठेवल्याने फोन हॅक करता येतो का ? की हा फक्त गैरसमज आहे. जाणून घ्या..

मुळात Bluetooth ही एक वायरलेस कम्युनिकेशन टेक्नोलॉजी आहे . जी आजूबाजूला असणाऱ्या डिव्हाईस सोबत कनेक्शन निर्माण करण्यासाठी रेडिओ प्रणालीचा वापर करते. त्यामुळेच आपण गाणी ऐकू शकतो. Bluetooth ऑन राहिल्याने फोन काही हॅक होती नाही. हे जरी खरे असले तरी बेसावध राहून चालत नाही. एखादे सॉफ्टवेअर किंवा Bluetooth शी बिघाड केल्याने तुमचा फोन सहज हॅक केला जाऊ शकतो.

हॅकिंगचा धोका केव्हा वाढतो

जर तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर जुने असेल तर तुमचा फोन सहज हॅक केला जाऊ शकतो. याशिवाय तुम्ही एखाद्या अनोळखी डिव्हाईससोबत कनेक्शन स्वीकार केल्यास हॅकरपर्यंत तुमची संपूर्ण माहिती पोहोचू शकते. त्यामुळे अनोळखी डिव्हाईससोबत कनेक्शन किंवा पेअरिंग करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. Bluetooth चालू असणे किंवा कोणत्याही डिव्हाईसशी कनेक्ट होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या फोनवर जरी Bluetooth चालू असले तरी त्याचा थेट संबंध हॅकिंगशी होत नाही.

फोन हॅकिंगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

  • तुमचा फोन नेहमी अपडेटेड ठेवा.

  • अनोळखी पेअरिंग कनेक्शन स्वीकारू नका.

  • सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या

  • गरज नसताना Bluetooth बंद ठेवा.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT