Onion For High Cholesterol saam tv
लाईफस्टाईल

Onion For High Cholesterol: रोज कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणी खाल्ला पाहिजे

Natural ways to manage cholesterol: कच्चा कांदा खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते का? कांद्यामध्ये असलेले पोषक घटक, हृदयाच्या आरोग्यासाठी होणारे संभाव्य फायदे, पचनक्रिया, वजन नियंत्रण आणि रक्तातील साखरेशी संबंधित परिणाम जाणून घ्या. आहारात कांद्याचा समावेश करताना कोणती काळजी घ्यावी, हेही समजून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीचा आहार बदललेली जीवनशैली आणि अयोग्य आहाराच्या सवयी यामुळे आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचल्यानंतर हार्ट अटॅक येण्याचा धोकाही वाढतो. अशा वेळी रोजच्या आहारात कच्च्या कांद्याचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते, असं भारतातील पोषणतज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी सांगितलंय. कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलशिवाय आरोग्याच्या इतर समस्यांमध्येही फायदा होऊ शकतो.

हाय कोलेस्ट्रॉल शरीरासाठी धोकादायक

जेव्हा सतत तेलकट आणि अनहेल्दी पदार्थ खातो त्यावेळी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल हळूहळू वाढू शकतं. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्याने त्या अरुंद होतात. त्यामुळे हृदयापर्यंत आणि शरीराच्या इतर भागांपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवताना अडथळे निर्माण होतात. याचा परिणाम रक्तदाबावरही होऊ शकतो. रक्तदाब वाढण्यासोबतच हृदयावर ताण येतो आणि पुढे हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे.

कच्चा कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत?

काही भाज्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होण्यास मदत होऊ शकते. कांदाही अशाच भाज्यांपैकी एक मानला जातो.

कच्चा कांदा खाण्याची सवय लावल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते, असं पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितलं आहे. तुम्हाला कच्चा कांदा खायला आवडत नसेल, तर त्याची कोशिंबीर बनवून खाऊ शकता. कांद्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडं मीठ घातल्यास त्याची चव आणखी चांगली लागते. कांद्याचा वापर फक्त कोशिंबीर बनवण्यासाठीच नाही, तर रोजच्या जेवणातील अनेक भाज्या आणि वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठीही केला जातो.

कांदा खाल्ल्याने आणखी कोणते फायदे होतात?

कांद्यामध्ये शरीरासाठी उपयोगी असणारे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रोजच्या आहारात कांद्याचा समावेश केल्यास आरोग्याला इतरही फायदे मिळू शकतात.

पचनक्रिया सुधारण्यास मदत

कांदा खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या कमी होण्यास आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात कांद्याचा समावेश करता येतो.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयोगी

कांदा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठीही कांदा फायदेशीर ठरू शकतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alkaline Water Benefits: अल्कलाईन वॉटर म्हणजे काय? कोणी प्यावे आणि कोणी पिणे टाळावे? जाणून घ्या फायदे

NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगड पर्यटकांनी गजबजले! अलिबागमध्ये दोन दिवसांत २० हजार पर्यटकांची हजेरी

Diwali 2026 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रडल्यास संपूर्ण वर्षभर भोगावे लागते दुःख? जाणून घ्या यामागचे सत्य

Gokul Election : सतेज पाटलांना मोठा धक्का! कोरमच्या खेळात महायुतीने बाजी मारली; 'हा' नेता बनला गोकुळचा नवा अध्यक्ष

SCROLL FOR NEXT