Diabetes Cause 
लाईफस्टाईल

Diabetes: तळलेले पदार्थ, समोसा खाल्ल्याने डायबिटीस होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Diabetes Cause: सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात तळलेले पदार्थ आणि समोसा खाल्याने मधुमेह होत असल्याचा दावा करण्यात आलाय.

Sandeep Chavan

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

आता बातमी आहे सगळ्यांसाठी महत्त्वाची. तुम्ही समोसा, तळलेले पदार्थ आवडीने खात असाल तर काळजी घ्या. कारण, तेलकट पदार्थ खाल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढू शकतो असा दावा करण्यात आलाय.त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात.

तुम्ही समोसा, चिप्स, तळलेले पदार्थ खात असाल तर तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो, असा एक दावा करण्यात आलाय. त्यामुळे खळबळ उडालीय. बरेच जण समोसा, तळलेले पदार्थ खात असतात. त्यामुळे या दाव्यात कितपत तथ्य आहे? याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या टीमने प्रयत्न केला. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

ICMRच्या रिसर्चनुसार, चिप्स, तळलेले चिकन, समोसे, पकोडे बेक केलेले पदार्थ जसे कुकीज, केक, फटाके तयार जेवण, अंड्यातील बलक यासारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने डायबिटीजचा धोका अधिक. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आमच्या टीमने याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ICMR च्या रिसर्चनुसार तळलेले पदार्थ खाणं डायबिटीसचं कारण असल्याचं समोर आलंय. मात्र, याबाबत आमच्या टीमने अधिक माहिती तज्ज्ञांकडून मिळवण्याचा प्रयत्न केलाय.

व्हायरल सत्य आणि साम इन्व्हिस्टिगेशन

रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने डायबिटीस होतो

समोसा, बर्गर,पिझ्झासारखे तळलेले पदार्थ खाणं टाळावं

जंकफूड, फास्टफूडमुळे लठ्ठपणा येतो

तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये

तळलेले पदार्थ खाणं आरोग्यास हानिकारक असतं

फास्टफूड खाणं टाळलं पाहिजे...कारण, त्याने आपलं वजन वाढू शकतं. आमच्या पडताळणीत तेलकट पदार्थ खाण्यामुळे डायबिटीस होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

Bigg Boss 18: 'मेरी मर्जी...' म्हणत विवियन अन् अविनाशने घरात घातला धुमाकूळ, 'टाइम गॉड' दिग्विजयच्या तोंडचे पाणी पळाले

Sangli News : शाळगाव एमआयडीसीत कंपनीमध्ये वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू

Maharashtra Exit Poll: दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ होणार आमदार? पाहा Exit Poll

Dahisar Exit Poll : दहिसर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? घोसळकर भाजपला धक्का देणार का?

SCROLL FOR NEXT