Do Breasts get Bigger During Periods saam tv
लाईफस्टाईल

मासिक पाळीदरम्यान खरंच स्तनांचा आकार वाढतो का? तज्ज्ञांनी सांगितलं शरीरात नेमकं काय होतं?

Do Breasts get Bigger During Periods : मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि भावनिक बदल होतात. हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे शरीरावर थेट परिणाम होतो. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे स्तनांमध्ये होणारा ताण, वेदना आणि संभाव्य आकारातील बदल.

Surabhi Jayashree Jagdish

मासिक पाळी ही काही समस्या नाही, मात्र त्यामुळे महिलांना इतर अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल आणि भावनिक बदलांबद्दल आपण सर्वांनी ऐकलं असेल, परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की, त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान स्तनांमध्ये वेदना आणि आकारात बदल अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळेच अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न येतो की, मासिक पाळीदरम्यान स्तनाचा आकार वाढू शकतो का?

जयपूरमधील 70 लाईफट्रॉन क्लिनिकच्या संचालिका आणि एसडीएम रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या एचओडी डॉ. निशी गुप्ता यांनी एका वेबसाईटला याबाबत माहिती दिली आहे. या आर्टिकलमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांच्या स्तनांच्या आकारात बदल होतो की नाही? हे डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत.

मासिक पाळीच्या चक्रामध्ये नेमकं काय होतं? What Happens During Menstrual Cycle

मासिक पाळी हे एक चक्र असून ते 21-35 दिवसांपर्यंत टिकू शकतं. या काळात शरीर गर्भधारणेसाठी तयार होतं. हे चक्र मासिक पाळीपासून सुरू होतं. यामध्ये ओव्हुलेशन काळ येतो. अंड्याला ओव्हुलेशनमध्ये फर्टिलाइज होण्याची संधी मिळते. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर मासिक पाळीबरोबर पुन्हा चक्र सुरू होतं. मासिक पाळी मेंदू आणि प्रजनन प्रणालीमधील बऱ्याच हार्मोन्सशी संबंधित क्रियांवर अवलंबून असते. जाणून घेऊया या हार्मोन्सची नावं:

  • एस्ट्रोजन

  • फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH)

  • ल्यूटिनाइजिंग हार्मोन (LH)

  • प्रोजेस्टेरोन

मासिक पाळीदरम्यान स्तनांमध्ये कोणते बदल होतात? What Changes Occur in the Breast Due to the Menstrual Cycle

मासिक पाळीत स्तनाच्या आत बदल होतात. हे बदल आपण चक्राच्या कोणत्या स्तरावर आहात यावर अवलंबून असतात. दरम्यान यावेळी महिलेला स्तनात सूज, वेदना आणि आकार बदल दिसू शकतात. मासिक पाळीपूर्वी, स्तनांना हात लावल्यास गाठीसारखा भाग लागणं आणि स्तन काहीसे जड वाटू लागणं. हे दुधाच्या ग्रंथींमध्ये झालेल्या वाढीमुळे होतं. यामध्ये प्रकरणात स्तन सूजलेले, वेदनादायक वाटू शकतात. मात्र हे बदल तात्पुरते असतात.

हे बदल मासिक पाळीमुळे होतात का याबाबत संशोधन सुरू आहे. मात्र मासिक पाळीदरम्यान स्तनात होणारे कोणतेही बदल कायमस्वरूपी नसतात. मासिक पाळीदरम्यान स्तनात काही असामान्य बदल दिसले तर या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT