Dream meaning SAAM TV
लाईफस्टाईल

Dream meaning: तुम्हालाही वारंवार एकच स्वप्न पडतंय का? स्वप्नशास्त्रात सांगितलेत यामागचे गूढ संकेत

Dream science: वारंवार तेच स्वप्न पडण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं? स्वप्नशास्त्र आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार अशा स्वप्नांचे अर्थ, सुप्त मनाचे संकेत, देवाचे आशीर्वाद आणि जीवनातील महत्त्वाचे संदेश जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आध्यात्मिक तसंच स्वप्नांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास वारंवार पडणाऱ्या स्वप्नांचे महत्त्वपूर्ण अर्थ असू शकतात. आपलं सुप्त मन आणि अंतरात्मा या स्वप्नांद्वारे विशिष्ट संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात. तर स्वप्नशास्त्र याबद्दल काय सांगतं ते जाणून घेऊया.

स्वप्नशास्त्र काय सांगते?

स्वप्नशास्त्रानुसार अस मानण्यात आलंय की, ज्यावेळी तुम्ही जीवनात नोकरी किंवा नातेसंबंधांची भीती असते त्यावेळी तुम्ही तणावाखाली असता. अशा परिस्थितीत तुम्हाला एकसारखी स्वप्न पडू शकतात.

वारंवार तेच स्वप्न पडणं हे या गोष्टीचंही प्रतीक असू शकतं की, तुम्हाला तुमच्या काही सवयी, विचार किंवा जीवनाची दिशा तातडीने बदलण्याची गरज आहे. म्हणून अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्यांचा विचार करा.

आध्यात्मिक संदेश

आध्यात्मिक मान्यतेनुसार, वारंवार पडणारी स्वप्नं ही ब्रह्मांडाकडून किंवा तुमच्या अंतरात्म्याकडून आलेले संदेश असू शकतात, जे तुम्हाला जागरूक राहण्याची, जुन्या कर्म-गुंता सोडवण्याची किंवा जीवनात योग्य मार्ग निवडण्याची आठवण करून देतात.

त्यामुळे अशा स्वप्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार स्वप्नात देव किंवा देवता दिसत असतील तर ते एक शुभ चिन्ह मानण्यात येतं. अशा स्वप्नांचा अर्थ असा आहे की, तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे.

अशा स्वप्नांचे इतर अर्थ

  • ज्यावेळी आपण जीवनात एखाद्या समस्येकडे, भीतीकडे किंवा दुःखाकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपले सुप्त मन स्वप्नांच्या माध्यमातून ती गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आणतं. जेणेकरून आपलं लक्ष त्याकडे वेधलं जावं.

  • स्वप्नशास्त्रात असं मानण्यात आलंय की, ज्यावेळी तुमच्या मनात एखादी तीव्र इच्छा किंवा ध्येय असतं जे तुम्हाला पूर्ण करायचं असतं, तेव्हा त्याच प्रकारचं स्वप्न पुन्हा पुन्हा पडू लागतं.

  • भूतकाळातील काही अपूर्ण कामं, एखादा धक्का किंवा तुम्ही विसरू न शकलेली जुनी आठवण, यामुळे देखील तुम्हाला तेच स्वप्न पुन्हा पुन्हा पडू शकतं.

  • जर तुम्हाला तेच स्वप्न पुन्हा पुन्हा पडत असेल तर याचा अर्थ असाही होऊ शकतो की, तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीबद्दल पश्चात्ताप होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT