Morning sneezing warning saam tv
लाईफस्टाईल

Morning sneezing warning: सकाळी डोळे उघडताच शिंका सुरू होतात? शरीर देतंय गंभीर आजारांचा इशारा

Sneezing after waking up causes: अनेकांना सकाळी उठल्यावर डोळे उघडताच सतत शिंक येते. हे केवळ साधे लक्षण नसून शरीर गंभीर आजाराची सूचना देत असते.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळची सुरुवात ही फ्रेश व्हावी असं सर्वांना वाटतं. अगदी छान चहाचा सुगंध, नवा दिवस आणि आशेने दिवसाची सुरुवात व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र काहींसाठी ही सुरुवात काहीशी वेगळी असते. गळणारं नाक आणि सततच्या शिंका यामुळे अनेकजण हैराण असतात.

यामुळे आपल्याला अनेकदा वाटतं की आपल्याला सर्दी किंवा साधा फ्लूचा त्रास होत असेल. पण जेव्हा हा त्रास रोजच होऊ लागतो तेव्हा ही फक्त सर्दी आहे की शरीर अधिक गंभीर समस्येचे संकेत देतंय यावर तुम्ही विचार केला पाहिजे.

सकाळी उठल्यावर वारंवार शिंका येणं ही एक सामान्य समस्या आहे. मात्र त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. बरेच लोकं ती हलक्यात घेतात परंतु ती ऍलर्जी, सायनस समस्या किंवा नाकाच्या समस्येचं हे लक्षण असू शकतं. यामागे काय संभाव्य कारणं असू शकतात ते पाहूयात.

सकाळी उठल्याबरोबर शिंका येण्याची कारणं

नॅचरल डिफेंन्स मेकॅनिझम

सतत शिंका येणं हे एक नॅचरल डिफेंन्स मेकॅनिझम मानलं जातं. ज्यावेळी आपल्या नाकामध्ये धूळ, घाण किंवा एखादा तीव्र वास शिरतो तेव्हा शरीर ते शिंकेद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो.

समस्येचं मूळ बेड असू शकतो

तुम्ही ज्या बेडवर झोपता तो कधीकधी शिंकण्याचं कारण बनू शकतो. गाद्या, उशा आणि चादरींमध्ये लहान धूळ कण असतात. जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हे कण रात्रभर बेडवर जमा होतात. हे कण तुमच्या नाकात जातात ज्यामुळे शिंका येऊ लागतात.

रूममधील एलर्जी

जर तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर त्यांचे केस तुमच्या बेडवर आणि तुमच्या खोलीत जमा होऊ शकतात. अशावेळी बाहेरून येणारे परागकण, धूळ आणि घाण रात्री खिडक्या उघड्या असतील तर त्यातून प्रवेश करू शकतात. सकाळी जेव्हा तुमचं नाक या अ‍ॅलर्जन्सच्या संपर्कात येते तेव्हा शिंका येतात.

तापमानात बदल होणं

रात्री तुम्ही चादर किंवा ब्लँकेटच्या आत शांत झोपता. अशावेळी सकाळी उठताच तुम्ही थेट पंखा किंवा एसीच्या हवेच्या संपर्कात येता. तापमानात अचानक बदल झाल्यामुळे तुमच्या नाकातील संवेदनशील त्वचेला त्रास होतो, ज्यामुळे शिंका येतात. हे अ‍ॅलर्जीमुळे नव्हे तर नाकाच्या संवेदनशील प्रतिक्रियेमुळे असू शकतं.

तीव्र वास

काही लोक रात्रीच्या वेळी तीव्र परफ्यूम, डासांना रोखण्यासाठी मशीन वापरतात. हे वास रात्री बंद खोलीत तसेच राहतात. अशावेळी सकाळी नाकात जळजळ होऊ शकतात.

सकाळी शिंका येणं कोणत्या समस्येचं लक्ष असू शकतं?

अ‍ॅलर्जीक राहिनाइटिस

सकाळच्या वेळी शिंका येण्याच हे सर्वात सामान्य लक्षण आहे. शरीर धूळ, परागकण यांवर प्रतिक्रिया देतं त्यावेळी शिंका येतात. सकाळी सतत शिंका येणं, नाक वाहणं किंवा बंद होणं, डोळ्यांना खाज सुटणं ही लक्षणं आहेत.

सायनस

जर शिंका येणं डोकेदुखी, चेहऱ्यावर दाब येत असेल तर ते सायनसची समस्या असू शकते.

ताप

वातावरणातील बदलामुळे ताप येऊ शकतो. अशावेळी नाक, डोळे आणि घशात जळजळ होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT