Chronic myeloid leukemia saam tv
लाईफस्टाईल

Chronic myeloid leukemia : रक्ताच्या या कॅन्सरबाबत तुम्हाला माहितीये का? असे ३ प्रश्न जे रूग्णाने डॉक्टरला विचारलेच पाहिजेत!

Surabhi Kocharekar

आतापर्यंत तुम्हाला लुक्येमिया बद्दल माहिती झालं असेल. ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग. सध्याच्या काळात कॅन्सरच्या रूग्णांमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कॅन्सरच्या पेशी शरीरात इतर ठिकाणी पसरू नयेत यासाठी या आजाराचं आधीच निदान होणं गरजेचं आहे. ल्युकेमियाचा एक प्रकार क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (सीएमएल) हा एक असा कॅन्सर आहे, जो बोन मॅरोमधील रक्त तयार करणाऱ्या पेशींमध्ये सुरू होतो आणि रक्तात पसरू शकतो.

याबाबत कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट हेमॅटोलॉजिस्‍ट डॉ. समीर तुळपुळे म्‍हणाले, "मी करत असलेल्या प्रॅक्टिसमध्ये मला असं दिसून आलंय की, क्रोनिक मायलॉइड ल्‍युकेमिया (सीएमएल)चं व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. यावेळी रूग्‍णांनी त्‍यांच्‍या बीसीआर-एबीएल पातळ्यांवर लक्ष द्यावं. यामुळे आम्‍हाला रूग्‍णांच्‍या उपचार प्रतिसादावर देखरेख ठेवण्‍यास आणि गरज असलयास वेळेवर बदल करण्‍यास मदत होते.

डॉ. समीर पुढे म्हणाले, याबाबत रूग्णांनी डॉक्टरांशी खुलेपणाने बोललं पाहिजे. जेणेकरून कोणत्‍याही आवश्‍यक बदलांचं निराकरण होण्‍याची, सीएमएलच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनाला मदत मिळण्‍याची आणि संपूर्ण उपचार प्रवासादरम्‍यान जीवनाचा दर्जा कायम राहण्‍याची खात्री मिळू शकते.

नियमित मॉनिटरिंगद्वारे प्रगतीवर लक्ष कसं ठेवायचं?

या कॅन्सरच्या मॅनेजमेंटसाठी नियमित बीसीआर- एबीएल तपासणी महत्त्वाची असते. या चाचण्या बीसीआर-एबीएल प्रोटीन पातळ्या तपासतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उपचारांची प्रगती तपासता येते.

सध्याच्या उपचारांमध्ये resistance or intolerance बाबत मला काय माहित असणं गरजेचं आहे?

टायरोसीन किनेस इनहिबिटर्स (टीकेआयएस) हा सीएमएल उपचारांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु कधी-कधी रूग्णांना त्यांच्याबाबत resistance or intolerance होऊ शकतं. यावेळी सातत्याने मळमळ होणे, स्नायूदुखी किंवा प्रचंड थकवा ही लक्षणं दिसून येतात. अशामध्ये वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

सीएमएल उपचारांमधील नवीन सुधारणा काय आहेत?

सीएमएल उपचार सध्या बदलत असून नवीन उपचार पद्धती सुधारित सुरक्षा आणि उपयुक्तता दर्शवतात. हे उपचार चांगले परिणाम दाखवू शकतात. ज्या व्यक्तींमध्ये कॅन्सर पुढच्या स्टेजमध्ये पोहोचला आहे, त्यांच्यासाठी हा फायदेशीर ठरू शकतो.

सीएमएलचे व्यवस्थापन ही एक बदलती प्रक्रिया असून तिला नियमित मॉनिटरिंग आणि अॅडजस्टमेंट्सची गरज पडते. यामध्ये केवळ उपचारांचं पालनच नाही तर वेळोवेळी फॉलोअप तसंच चाचण्यांच्या वेळा ठरवून तुमच्या रोगांवर आणि उपचारांना प्रतिसादांवर लक्ष ठेवणं या गोष्टींचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghodbunder Road Traffic : घोडबंदर रोड वाहतूक कोंडीच्या सापळ्यातून मुक्त होणार; कसा आहे प्लान? वाचा सविस्तर

Share Market : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शेअर बाजारात भूकंप; व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सवर काय परिणाम झाला? वाचा

Astro Tips: कोणत्या दिवशी खाऊ नये तुळशीचे पान; जाणून घ्या

Shubman Gill: शतक ठोकत शुबमनची सचिन-कोहलीच्या अनोख्या क्लबमध्ये एन्ट्री, बाबरलाही पिछाडलं

Maharashtra News Live Updates : आंध्र, तेलंगणाला पॅकेज जाहीर करतात पण महाराष्ट्राला मदत नाही, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

SCROLL FOR NEXT