Holi Festival Stylish Look Saam Tv
लाईफस्टाईल

Holi Festival Stylish Look : होली के दिन..., असा करा सिंपल पण स्टायलिश होळी लूक !

Fashion Tips : आजच्या काळात लोक होळीसाठी वेगवेगळे आउटफिट तयार करतात.

कोमल दामुद्रे

Holi Fashion Tips : होळी हा सण आपल्याकडे मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक रंगांशी खेळत खूप धमाल करतात. एक काळ असा होता की होळीसाठी जुने कपडे शोधावे लागायचे. पण, आजच्या काळात लोक होळीसाठी वेगवेगळे आउटफिट तयार करतात.

अनेक लोक होळीच्या दिवशी मोठ्या पार्टीचे आयोजन करतात, त्या पार्टीसाठी थीम आधीच ठरलेल्या असतात. मात्र, सर्वच पार्टीबद्दल थीम ठरलेली नसते.तर अशा वेळेस स्टायलिश लूक करण्यासाठी मुलींसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की, त्यांनी कोणते कपडे घालावेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला होळीसाठी आउटफिट निवडण्यासाठी काही टिप्स (Tips) सांगणार आहोत.

1. दीपिका पादुकोणसारखा लेहेंगा घालू शकता

जर तुम्हाला होळीनिमित्त वेगळा लूक करायचा असेल तर लेहेंगा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पांढऱ्या आणि लाल रंगाच्या स्कर्टसोबत तुम्ही काळा किंवा लाल रंगाचा ब्लाउस वेअर करून खूप सुंदर दिसू शकता. रामलीला चित्रपटातील दीपिकासारखा लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही कानात मून इअररिंगज घालू शकता.

2. साडीपेक्षा चांगला पर्याय नाही

कोणत्याही सणानिमित्त (Festival) साडी परिधान करून खूप सुंदर दिसता येते. त्यामुळे होळी या सणाला देखील तुम्ही कोणत्याही रंगाची साडी किंवा तुमच्या आवडीच्या रंगाची साडी परिधान करू शकता.

3. पांढरा किंवा गुलाबी सूट

कंफर्टेबल आणि ट्रेडीशनल लूक करण्यासाठी सूट हा खूप चांगला पर्याय आहे. पांढरा किंवा गुलाबी सूट वेअर करून त्यासोबत रंगीबेरंगी दुपट्टा घेयायला विसरू नका. त्यामुळे तुमचा लूक खूप सुंदर दिसतो.

4. या काही गोष्टी लक्षात ठेवा

होळीसाठी ड्रेस खरेदी करताना, खूप महाग ड्रेस खरेदी करू नये कारण तो ड्रेस होळी खेळल्यानंतर पुन्हा वापरता येणार नाहीत. त्यामुळे महागडे ड्रेस घेणे टाळावे.जर तुम्ही होळीच्या दिवशी जड कानातले घालत असाल तर केस (Hair) मोकळे सोडू नका कारण त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित एन्जॉय करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT