Makar Sankranti Saam tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला ही कामं नक्की करा, सुख-समृद्धी लाभेल

मकर संक्रांती हा देखील असाच एक विशेष सण आहे. या दिवशी काही महत्त्वाचे काम केल्याने खूप फायदा होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Makar Sankranti 2022: मुंबई : हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही कामांना खूप महत्त्व दिले गेले आहे. ही कामे इतकी चांगली आणि पवित्र आहेत की त्यांची फळे जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही मिळतात, अशी मान्यता आहे. विशेष प्रसंगी केलेले हे कार्य आयुष्यात सुख-समृद्धी, आनंद आणतात. तसेच, वाईट कर्मांमुळे प्राप्त झालेल्या पापांचा नाशही करते. मकर संक्रांती (Makar Sankranti) हा देखील असाच एक विशेष सण आहे. या दिवशी काही महत्त्वाचे काम केल्याने खूप फायदा होतो आणि पापांचा नाशही होतो, अशी मान्यता आहे (Do these things on Makar Sankranti 2022 will bring you happiness and prosperity).

मकर संक्रांतीच्या दिवशी ही कामं करावी

सूर्याची उपासना करा -

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य (Sun) उत्तरायण होते. या दिवसापासून सूर्याचा प्रकाश दीर्घकाळ पृथ्वीवर पडतो. त्यामुळे दिवस मोठा होता आणि रात्र लहान होऊ लागते. या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि पूजा करावी.

पवित्र नदीत स्नान करावे -

मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा त्यांचं पाणी मिसळलेल्या पाण्याने स्नान केल्याने पापांचा नाश होतो. पौराणिक कथेनुसार, या दिवशी सूर्य आपला पुत्र शनिदेवावरील नाराजी सोडून त्याच्या घरी गेले. त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत (River) स्नान केल्याने खूप पुण्य मिळते.

दान करा -

मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी तीळ, गूळ, खिचडी, नवीन कपडे, ब्लँकेट दान करावे.

गायीला हिरवा चारा खायला द्यावा -

मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्या. त्यामुळे पुण्य मिळते आणि सुख-समृद्धी वाढते.

तीळ-गूळ खावे -

मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ-गूळ खावे. यामुळे सूर्यदेव आणि शनिदेव दोघांचीही कृपा होते. याशिवाय, हिवाळ्यात होणारे आजारही दूर राहतात. तसेच, यादिवशी देवाला खिचडीचे नैवेद्य दाखवून ती प्रसाद स्वरुपात स्विकारावी.

(टीप - येथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसाधारण धार्मिक मान्यता आणि माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याचं कुठलंही वैज्ञानिक कारण नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांना सल्ला घ्या...)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra News Live Update: कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर पाठोपाठ, आता कुंभासाठी बोगस भरतीचा प्रकार उघड

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

SCROLL FOR NEXT