Dhanteras 2026 saam tv
लाईफस्टाईल

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला 'या' 5 वस्तू चुकूनही घरात येऊ देऊ नका; जाणून घ्या कोणत्या गोष्टी मानल्या जातात अशुभ

Dhanteras shopping tips: धनत्रयोदशीला खरेदी करताना काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. धार्मिक मान्यता आणि वास्तुशास्त्रानुसार लोखंड, काच, प्लास्टिकसह कोणत्या ५ वस्तू खरेदी करू नयेत? तसेच या दिवशी सोने, चांदी, झाडू आणि इतर कोणत्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीचा सण जवळ आला की बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होते. दिवाळीच्या आधी येणाऱ्या धनत्रयोदशीला तर खरेदीला विशेष महत्त्व असतं. या दिवशी सोनं-चांदी, भांडी आणि नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीला घरी आणलेल्या वस्तूंमुळे सुख, समृद्धी आणि भरभराट येते अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते.

पण धनत्रयोदशीला प्रत्येक वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं असं नाही. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार, काही वस्तू या दिवशी घरी आणणं टाळावं, असं सांगितलं जातं. यामध्ये लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंपासून ते काच आणि प्लास्टिकच्या सामानाचाही समावेश आहे. तुम्हीही धनत्रयोदशीच्या खरेदीची तयारी करत असाल तर कोणत्या ५ वस्तू खरेदी करणं टाळावं.

धनत्रयोदशीला कोणत्या ५ वस्तू खरेदी करणं टाळावं?

लोखंडाच्या वस्तू

धनत्रयोदशीला लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नयेत अशी धार्मिक मान्यता आहे. लोखंडाचा संबंध शनिदेवांशी जोडला जातो. त्यामुळे या दिवशी लोखंडाची भांडी, अवजारं किंवा इतर वस्तू घरी आणणं शुभ मानलं जात नाही. याऐवजी अनेक जण तांबे, पितळ आणि चांदीच्या वस्तू खरेदी करण्याला पसंती देतात.

काचेच्या वस्तू

वास्तुशास्त्रानुसार, धनत्रयोदशीला काचेच्या वस्तू खरेदी करणं टाळावं. कारण काच सहज फुटू शकते. त्यामुळे ती नाजूक वस्तू मानली जाते. या दिवशी काचेची भांडी, क्रॉकरी किंवा घर सजवण्यासाठी लागणारं काचेचं सामान खरेदी करणं शुभ मानलं जात नाही.

चाकू, कात्री आणि धारदार वस्तू

धनत्रयोदशीला चाकू, कात्री, सुई किंवा इतर धारदार वस्तू खरेदी करणं टाळावं अशीही मान्यता आहे. अशा वस्तूंना नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सणाच्या दिवशी या वस्तूंची खरेदी करू नये, असा सल्ला दिला जातो.

काळ्या रंगाच्या वस्तू

धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणं टाळलं जातं. हिंदू धर्मातील अनेक शुभ कामांमध्ये काळ्या रंगाचा वापर करणं टाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे, घर सजवण्याच्या वस्तू किंवा इतर सामान खरेदी करण्याऐवजी हलक्या आणि शुभ मानल्या जाणाऱ्या रंगांना पसंती दिली जाते.

प्लास्टिकच्या वस्तू

धनत्रयोदशीला प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणंही शुभ मानलं जात नाही. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, प्लास्टिकच्या वस्तूंना धातूच्या वस्तूंप्रमाणे शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जात नाही. त्यामुळे या दिवशी प्लास्टिकची भांडी, डबे आणि घर सजवण्यासाठी लागणारं प्लास्टिकचं सामान खरेदी करणं टाळावं, असं सांगितलं जातं.

धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं?

धनत्रयोदशीला काही ठराविक वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची कृपा राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • सोने-चांदी- धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचे दागिने आणि नाणी खरेदी करणं शुभ मानलं जातं.

  • पितळ आणि तांब्याची भांडी- या दिवशी धातूची भांडी खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. पितळ आणि तांब्याच्या भांड्यांना महत्त्व दिलं जातं.

  • झाडू- धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने घरातील गरिबी आणि दारिद्र्य दूर होतं, अशी मान्यता आहे.

  • धणे- या दिवशी अख्खे धणे खरेदी करणं शुभ मानलं जातं. दिवाळीच्या पूजेतही हे धणे ठेवले जातात.

  • गोमती चक्र- धार्मिक मान्यतेनुसार, गोमती चक्र घरात ठेवल्याने सुख आणि समृद्धी येते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Battery: बाईकची बॅटरी साधारण किती वर्षे टिकते?

Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? महाराष्ट्रातील नेत्यानं दिली महत्वाची अपडेट

कल्याण-उल्हासनगरची वाहतूक कोंडी फुटणार; ३२५ कोटींचा मेगा प्रोजेक्ट, शिंदेंचा मोठा निर्णय!

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रे उत्सवाला सुरुवात

MPSC उमेदवारांसाठी मोठी गुड न्यूज! 16 हजारांहून अधिक पदांची भरती होणार? नेमकी काय आहे शिफारस?

SCROLL FOR NEXT