Diwali Padwa Couple Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Diwali Padwa Couple Tips : दिवाळी पाडव्याच्या दिवशी पती-पत्नीने चुकूनही या गोष्टी करू नयेत; नात्यात दुरावा येईल

Diwali Padwa 2024 Don't do this mistake: पती-पत्नीकडून काही शुल्लक चुका होतात ज्याने संपूर्ण वर्ष त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. नात्यात दुरावा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पती पत्नीने पाडव्याला या चुका टाळाव्यात.

Ruchika Jadhav

दिवाळी पाडवा प्रत्येक पती-पत्नीच्या आयुष्यातील सर्वात मोठा सण असतो. या दिवशी प्रत्येक पती आपल्या पत्नीला गिफ्ट देतात. पत्नीविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करतात. काही कपल्स या दिवशी बाहेर फिरण्यासाठी जातात आणि एकत्र कॉलिटी टाइम स्पेंड करतात.

हा दिवस फार महत्वाचा असल्याने दिवाळी पाडव्याला प्रत्येक पती आणि पत्नीने काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. मात्र कितीही एकमेकांवर प्रेम असले तरी पती-पत्नीकडून काही शुल्लक चुका होतात ज्याने संपूर्ण वर्ष त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. नात्यात दुरावा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पती पत्नीने पाडव्याला या चुका टाळाव्यात.

वाद करू नये

पाडवा पती-पत्नीच्या नात्यातील खास सण असल्याने या दिवशी तुमच्या पार्टनरसोबत भांडणे करू नका. काही चुका झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. पार्टनरचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.

अनादर करणे

आदर प्रत्येक नात्यात महत्वाचा असतो. प्रत्येक पती आणि पत्नीच्या नात्यात देखील एकमेकांसाठी आदर फार महत्वाचा आहे. तुम्ही एकमेकांचा आदर न केल्याने नात्यातील दुरावा वाढतो.

पत्नीसाठी गिफ्ट खरेदी करा

कामाच्या व्यापात अनेक पती आणि पत्नी पाडवा असल्याचं विसरून जातात. त्यामुळे ऐनवेळी त्यांच्याकडे गिफ्ट नसते. पाडव्याच्याच दिवशी असं करू नका. कारण असे केल्याने पत्नीच्या मनातील तुमच्या बद्दलचे प्रेम कमी होते.

एकत्र कामे संपवा

घरात आणि ऑफिसमध्ये पतीसह पत्नीला देखील बरीच कामे असतात. अशात दोघांनी देखील घरकामात एकमेकांना मदत केली पाहिजे. अनेक घरांमध्ये फक्त पत्नी राबराब राबते. त्यामुळे नात्यात वाद आणि तणाव निर्माण होतो. असे होऊ नये म्हणून पती आणि पत्नी दोघांनी मिळून कामे केली पाहिजेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता PFचे पैसे थेट ATM मधून काढता येणार, तारीख आली समोर

Maharashtra News Live Update: पुराळेगांवात कापसाला 8 हजार 700 रूपयांचा दर

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

SCROLL FOR NEXT