Save Energy
Save Energy Saam Tv
लाईफस्टाईल

घराचे वीज बिल खूप जास्त येत आहे? हा छोटासा बदल करा, दरमहा हजारो रुपये वाचतील

वृत्तसंस्था

Different ways to reduce electricity bill: घराचे वीज बिल (Electricity Bill) जास्त येत असल्यामुळे अनेकजण चिंतेत आहेत. उन्हाळ्यात हा त्रास वाढतो. पण, काही बदल करून तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता. याच्या मदतीने तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. वीजबिल कमी करण्याचे कोणतेही रॉकेट सायन्स नाही. यासाठी तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतील आणि काही ठिकाणी मर्यादा घालाव्या लागतील. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात सर्वाधिक बिल एसीमुळे येते. पण, तुम्ही ते बदलू शकता.

हे देखील पाहा -

तुमच्या घरात बसवलेला एसी खूप जुना झाला असेल किंवा नॉन-इन्व्हर्टर एसी बसवला असेल, ज्याचे रेटिंग कमी असेल, तर तुमचे वीज बिल जास्त येणार. हे कमी करण्यासाठी तुम्ही नवीन इन्व्हर्टर एसी खरेदी करू शकता. नवीन एसी खरेदी करताना तुम्हाला रेटिंगचीही काळजी घ्यावी लागेल.

उच्च रेट असलेल्या इन्व्हर्टर एसीच्या मदतीने तुम्ही वीज बिल लक्षणीयरीत्या कमी करू शकता. याशिवाय 24 ते 25 डिग्री तापमानातच एसी चालवा. त्यामुळे एसी जास्त वीज वापरत नाही आणि तुमच्या घराचे वीज बिल कमी येते.

जर तुम्ही बर्याच काळापासून एसी सर्व्हिसिंग केली नसेल तर आधी एसी सर्व्हिसिंग करा. याशिवाय घरातील लाईट आणि इतर उपकरणे गरजेनुसार वापरा. तुम्ही अजूनही CFL बल्ब वापरत असाल तर लगेच LED बल्बचा वापर करा. जर तुम्ही थंडीच्या दिवसात गिझर वापरत असाल तर इलेक्ट्रिक गिझरऐवजी गॅस गिझर वापरल्यास तुमच्या घराचे वीज बिल कमी होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

SCROLL FOR NEXT