Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : प्रेम की, आकर्षण? कसे कळेल तुमच्या नात्यातील अंतर

Difference Between Love and Attraction : प्रेमात पडणं ही भावना खूपच सुखद असते. अनेकदा मुलगी किंवा मुलगा पाहाताच क्षणी एखाद्याच्या प्रेमात पडतात. परंतु, वास्तवात या गोष्टीत किती तथ्य आहे याबद्दल कुणालाही कळत नाही.

कोमल दामुद्रे

Are You Confused Between Attraction and Love :

प्रेमात पडणं ही भावना खूपच सुखद असते. अनेकदा मुलगी किंवा मुलगा पाहाताच क्षणी एखाद्याच्या प्रेमात पडतात. परंतु, वास्तवात या गोष्टीत किती तथ्य आहे याबद्दल कुणालाही कळत नाही.

नवीन नात्यात आल्यानंतर आपला नेहमीच गोंधळ उडतो अशावेळी नेमके काय करावे हे कळत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम (Love) आणि आकर्षण या दोन गोष्टींमध्ये फरक समजणे गरजेचे आहे. आकर्षण हे क्षणिक असते त्यामुळे काही काळाने आपल्या जोडीदाराबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम देखील कमी होत जाते. असे नाते अधिक काळ टिकत नाही.

त्यासाठी तुम्ही कोणत्याही नात्यात (Relation) येत असाल तर तुम्ही नक्की प्रेमात आहात की, समोरच्या बदल तुम्हाला आकर्षण हे समजून घेणे अधिक गरजेचे आहे. जर तुम्ही नात्यात आल्यानंतर कळाले की, हे फक्त आकर्षण आहे तर तुमचे नाते लवकरच तुटू शकते. त्यामुळे योग्य वेळी तुमच्या मनातील भावना ओळखणे गरजेचे आहे. तुमचे तुमच्या जोडीदारावर (Partner) खरेच प्रेम आहे की, आकर्षण हे कसे कळले जाणून घेऊया.

1. इतर गोष्टींना अधिक प्राधान्य

प्रेमात पडलेली व्यक्ती पार्टनरसोबत अधिक वेळ राहाण्याचा प्रयत्न करतो परंतु, जर हे आकर्षण असेल तर एकत्र वेळ घालवण्यासाठी टाळाटाळ केली जाते. तसेच त्या व्यक्तीला प्राधान्य कधीच दिले जात नाही.

2. भविष्याबद्दल गोष्टी

प्रेमात पडलेले लोक आपल्या भविष्याचा एकत्रितपणे विचार करतात. तसेच भविष्याबद्दल योजना एकत्र आखतात आणि त्यासाठी कठोर परिश्रम देखील करतात. आकर्षण असणाऱ्या लोक कधीच भविष्याची चिंता करत नाही.

3. शारीरिक संबंध

प्रेमात असणाऱ्या माणसांना शारीरिक संबंधाची आवश्यकता नसते. यामध्ये पार्टनर हा भावनिकदृष्ट्या जोडलेला असायला हवा. आकर्षणाचा केंद्रबिंदू हा शारीरिक जवळीकता मानली जाते. यामध्ये ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीची आवडी-निवडी कधीच जपत नाही.

4. वैयक्तिक जीवन

प्रेमात पडलेला माणूस आपल्या जोडीदारासमोर आरशासारखा असतो. त्याच्या चुका, उणिवा, गुण लपून राहात नाही. परंतु, आकर्षणात सगळ्या गोष्टी या वैयक्तिक असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

SCROLL FOR NEXT