Diabetes Warning Signs saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

Diabetes Warning Signs: मधुमेहासारख्या गंभीर समस्येला वेळीच प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु कधीकधी लोकांना काही संकेत समजू शकत नाहीत जे शरीर त्यांना सतत देत असतं.

Surabhi Jagdish

गेल्या काळापासून संपूर्ण जगात मधुमेहाचं प्रमाण वाढताना दिसतंय. लोकांमध्ये या गंभीर समस्येबद्दल जनजागृती व्हावी यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून मानला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मधुमेहामुळे तणाव, चिंता, कमकुवत प्रतिकारशक्ती, ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या समस्यांचा धोका असतो. त्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर समस्येला वेळीच प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु कधीकधी लोकांना काही संकेत समजू शकत नाहीत जे शरीर त्यांना सतत देत असतं.

तुम्हाला माहिती आहे का की, ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या पायात काही खास लक्षणं दिसून येतात. रूग्णांना मधुमेहाची पायामध्ये नेमकी कोणती लक्षणं दिसून येतात, ती जाणून घेऊया.

मधुमेहाची लक्षणं कोणती?

  • सतत तहान लागणं

  • थकवा

  • तोंड सुक पडणं

  • हाता-पायात मुंग्या येणं

  • सतत लघवीला जाणं

  • धुसरं दिसणं

  • जखम लवकर बरी न होणं

मधुमेहाची पायांमध्ये दिसून येणारी लक्षणं

पायांची जखम

ज्या व्यक्तीला मधुमेह असतो तेव्हा तुम्हाला जास्त तहान लागते. याशिवाय मधुमेही रुग्णांना पायाला जखमा आणि अल्सरसह लवकर बऱ्या होत नाहीत. याशिवाय झालेली जखम चिघळण्याची शक्यताही अधिक असते.

पायांचा रंग बदलणं

ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्या पायाच्या रंगात बदल दिसून येण्याची शक्यता असते. याचं कारण म्हणजे रक्तप्रवाहात अडथळा येणं, फंगल इन्फेक्शन, ऍथलीटच्या पायाला लागणं, या समस्या मधुमेही रुग्णांमध्ये दिसून येऊ शकतात.

मुंग्या येणं

मधुमेही रुग्णांना अनेकदा पायात मुंग्या येण्याची समस्या जाणवू शकते. त्यामुळे तुम्हाला ही समस्या सतत जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit poll : महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? सट्टा बाजाराचे वारे कोणाच्या बाजूने?

Maharashtra Exit Poll: श्रीगोंदा मतदारसंघातून विक्रम पाचपुते होणार आमदार? पाहा Exit Poll

Solapur News : मतदानाच्या दिवशी फटाके फोडणे पडले महागात; सोलापुरात सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Ulhasnagar Crime : भयंकर! खेळता खेळता भाचीला धक्का दिला, जीवच गेला, नंतर मामाने नात्याची हद्द पार केली!

Maharashtra Exit Poll 2024 : चंद्रकांत पाटलांना कोथरुडकर पुन्हा आमदार करणार का? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

SCROLL FOR NEXT