लहान मुलांमध्ये बार्बी डॉलची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. अशातच मॅटेल कंपनीनं अनोखी बार्बी डॉल बाजारात आणलीय. आतापर्यंत शेफ बार्बी, डॉक्टर बार्बी डॉल तुम्ही पाहिली असेल. मात्र आता बार्बी डॉललाच डायबिटीज झालाय, असं दाखवण्यात आलाय. त्यामुळे डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी तयार करण्यात आलेल्या डायबिटीज बार्बी डॉलची सोशल मीडियावर चर्चा सुरु झालीय. मॅटेलनं Breakthrough T1D सोबत मिळून या बार्बी डॉलची निर्मिती केलीय. या बार्बी डॉलचं वैशिष्ट्य काय? पाहूयात...
डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी 'बार्बी डॉल'
'बार्बी डॉल'ला डायबिटीज असल्याचे दाखवण्यात आलाय
मॅटेलची बार्बी डॉल Fashionistas 2025 सिरीजचा भाग
टाइप-1 डायबिटीजग्रस्त मुलांच्या दैनंदिन दिनचर्येनुसार बार्बीचे डिझाइन
बार्बी डॉल लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणार
बार्बी डॉलमध्ये इन्सुलिन पंप, ग्लुकोज मॉनिटरचा समावेश
डायबिटीजग्रस्त लहान मुलांना रोगाशी झुंज देण्यासाठी प्रेरणा देण्याचा उद्देश
भारतासह जगभरात टाईप 1 मधुमेहाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये धोक्याची घंटा म्हणजे यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे डायबिटीज बार्बी डॉल अनेक लहान मुलांच्या मनोरंजनासह आरोग्याची काळजी घेण्यासाठीही फायदेशीर ठरणार आहे. तरी आय़डीएफनं जारी केलेल्या अहवालानुसार जगभरातील लहान मुलांमधील डायबिटीज चिंता वाढवणारा आहे.
चिमुरड्यांनाही 'डायबिटीज'चा धोका
जगभरात 12.11 लाखांहून अधिक लहान मुलं टाइप 1 मधुमेहग्रस्त
निम्म्याहून अधिक मुलांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी
भारतात 2.29 लाखांहून अधिक मुलं टाइप 1 मधुमेहग्रस्त
टाइप 1 मधुमेहाचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त
मॅटेलची डायबिटीज बार्बी डॉल ही टाईप - 1 डायबिटीज असणाऱ्या लहान मुलांच्या मनोरंजनासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आलीय. मात्र लहान मुलांमधील वाढत्या डायबिटीज रुग्णांची संख्या पालकांची चिंता वाढवणारी आहे. बार्बी डॉल लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणार असली तरी पालकांनीही सजग राहणं गरजेचे आहेच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.