ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आता गणेश चतुर्थीला केवळ ३ दिवस बाकी आहेत.
आपल्याही घरी गणेशाचं आगमन व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं.
काहींच्या घरी गणपती आणण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.
काहीजण यावर्षी पहिल्यांदाच त्यांच्या घरात गणपतीची स्थापना करणार आहेत.
अशात गणेश मुर्तीची स्थापना करताना काही चुका चुकूनही करू नयेत.
शास्त्रानूसार घरात स्थापनेसाठी आणलेल्या गणेश मुर्तीची उंची ११ इंच ते किमान १ फूट इतकीच असावी.
कोणत्याही धातूने किंवा वेगवेगळ्या वस्तूंनी बनलेली मुर्ती पूजेसाठी घेऊ नये. शाडूच्या मातीची मुर्तीच आणावी.
घरात स्थापन केली जाणारी गणपतीची मुर्ती बसलेल्या स्थितीतच असावी. उभी किंवी नृत्याच्या स्थितीत नसावी.
गणेशाच्या मुर्तीचे विसर्जन दीड दिवसात किंवा अनंत चतुर्थीपर्यंत करणे योग्य ठरते. त्यापेक्षा जास्त दिवस मुर्ती ठेवू नये.