ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
येत्या २७ तारखेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
या दिवशी घराघरात बाप्पाचे आगमन होणार आहे.
सर्व गणेश भक्तांना बाप्पाच्या सेवेत आपल्याकडून कोणतीही कमी राहू नये असे वाटत असते.
अशा ५ गोष्टी आहेत ज्या गणेशाला चुकूनही अर्पण करू नये.
लसुन आणि कांदा असलेले जेवण तामसिक असते. त्यामुळे ते गणपतीला कधीही अर्पण करू नये.
तुळशीची पाने औषधी आणि पवित्र असली तरीही, गणेशाला तुळस अमान्य आहे.
गणेशाच्या पुजा-अर्चेवेळी वापरल्या जाणाऱ्या अक्षदा या आख्या तांदळाच्या असायला हव्यात.
बाप्पाला नेहमी ताजी फुलं आणि हार अर्पण करावे. कोमेजलेली फुले अर्पण करू नये.
गणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाणारी फळे स्वच्छ व न किडलेली असावीत.