Dhanteras 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Dhanteras 2024 : 29 की 30 ऑक्टोबर केव्हा आहे धनत्रयोदशी? वाचा तारीख आणि शुभ मुहूर्त

Dhanteras : धनत्रयोदशी केव्हा आहे याची तारीख आणि वेळ आज या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. प्रत्येक व्यक्ती या सणाची आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी म्हटलं की घरोघरी फराळ बनवले जाते. दिवाळी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशीला व्यक्ती धन देवता कुबेर यांनी पूजा करतात. या दिवशी घरी एखादी वस्तू खरेदी करून आणणे अत्यंत शुभ मानले जाते. याने घरातील धन आणखी वाढते. चला तर मग यंदा धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस कधी आहे आणि याचा शुभ मुहूर्त काय आहे याची माहिती जाणून घेऊ.

केव्हा आहे 2024 ची धनतेरस

साल 2024 मध्ये धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला आहे की 30 ऑक्टोबरला यामुळे व्यक्ती संभ्रमात आहेत. त्यामुळे आज याची योग्य तारीख जाणून घेऊ.

वैदिक पंचांगानुसार यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 34 मिनिटांनी सुरू होत आहे. तर 30 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता?

हिंदू धर्मात धनत्रयोदशीला फार महत्व आहे. यासाठी योग्य मुहूर्त गोधली काळात असल्याचं म्हटलं जातं. शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी सुरू होतो. तर रात्री 8 वाजून 52 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त सुरू असतो. तुम्ही या काळात पूजा करू शकता.

पूजेचे महत्व

प्रत्येक व्यक्ती धनत्रयोदशी आपल्याकडे असलेल्या पैशांनुसार साजरा करतात. या दिवशी काही व्यक्ती नवीन घर खरेदी करतात. तर काही व्यक्ती गाडी, सोने आणि चांदी खरेदी करतात. यात सर्वात महत्वाचे म्हणजे झाडू. व्यक्तीने झाडू खरेदी केला पाहिजे तसेच याची पूजा केली पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT