Dev Diwali Trip To Varanasi Saam TV
लाईफस्टाईल

Dev Diwali Trip: देव दिवाळीला वाराणसीला जाण्याचा प्लॅन करताय? ३ दिवसांत पाहा काशीचे सुंदर घाट, गंगा आरती; असे करा ट्रिपचे नियोजन

Dev Diwali Trip To Varanasi: यंदाच्या देव दिवाळीसाठी वाराणसीला गंगा आरतीसाठी जाण्याचा प्लॅन करताय? मग, हा तीन दिवसांचा ट्रिप प्लॅन नक्की फॉलो करा.

Shruti Vilas Kadam

Dev Diwali Trip: भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेमध्ये देव दीपावलीला विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा हा उत्सव पाहण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक वाराणसी अर्थात बनारसमध्ये दाखल होतात. यंदा २४ नोव्हेंबर रोजी देव दीपावली साजरी केली जाणार आहे. या दिवशी काशीतील गंगेचे घाट हजारो मातीच्या दिव्यांनी उजळून निघतात. गंगा आरती, दीपदान आणि फटाक्यांची आतषबाजी हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. जर तुम्ही यंदा देव दिवाळीच्या निमित्ताने बनारसला जाण्याचा विचार करत असाल, तर तीन दिवसांची ही ट्रिप तुमच्यासाठी खास ठरू शकते. कमी वेळेत काशीतील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी हा प्लॅन नक्की फॉलो करा

पहिला दिवस : अस्सी घाट आणि गंगा आरतीचा अनुभव

देव दिवाळीच्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी २३ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत वाराणसीला पोहोचण्याचा प्रयत्न करा. हॉटेलमध्ये चेक-इन करून थोडी विश्रांती घ्या. त्यानंतर संध्याकाळी प्रसिद्ध अस्सी घाट पाहायला जा. येथे सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहण्यासोबतच गंगा आरतीचा अनुभव घेता येईल. रात्री बनारसचे प्रसिद्ध स्थानिक खाद्यपदार्थ खायला विसरू नका.

दुसरा दिवस : काशी विश्वनाथ दर्शन आणि देव दिवाळीचा उत्सव

सकाळी लवकर उठून गंगेत स्नान करा आणि काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी जा. सकाळी लवकर गेल्यास गर्दी मिळणार नाही. त्यानंतर बनारसचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड खा आणि काही वेळ विश्रांती घ्या. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घाटांवर पोहोचा. देव दिवाळीनिमित्त घाटांवर दीपदानाला सुरुवात होते. हजारो मातीच्या दिव्यांनी उजळलेले घाट, गंगेच्या लाटांवर पडणारे दिव्यांचे प्रतिबिंब आणि भव्य गंगा आरती हे दृश्य मनाला मोहून टाकणारे असते. शक्य असल्यास बोटीतून हा सोहळा पाहा. फटाक्यांची आतषबाजी या उत्सवाचे सौंदर्य आणखी वाढवते.

तिसरा दिवस : सारनाथला भेट आणि परतीचा प्रवास

तिसऱ्या दिवशी सकाळी वाराणसीपासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सारनाथला भेट द्या. बौद्ध धर्माच्या इतिहासात या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. येथे धमेख स्तूप, चौखंडी स्तूप आणि पुरातत्व संग्रहालय पाहता येईल. शांत वातावरणात काही वेळ घालवल्यानंतर परतीच्या प्रवासाची तयारी करा.

देव दिवाळीला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा

देव दिवाळीच्या काळात वाराणसीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे हॉटेल आणि बोटीचे बुकिंग आधीच करा. घाटांजवळील हॉटेलचे दर वाढू शकतात, त्यामुळे पर्यायी ठिकाणांचाही विचार करा. वाहतुकीवरील निर्बंधांमुळे बऱ्याच ठिकाणी पायी चालावे लागू शकते. म्हणून आरामदायक शूज सोबत ठेवा. नोव्हेंबरमध्ये संध्याकाळी थंडी जाणवू शकते, त्यामुळे जॅकेट आणि उबदार कपडे सोबत ठेवा. अशा प्रकारे तीन दिवसांचे योग्य नियोजन केल्यास देव दिवाळीचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Ticket : तुमच्या नावाच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती करू शकणार प्रवास, रेल्वे विभागाचा नवा नियम

Health Tips : भूक नसतानाही सारखं काहीतरी खावंसं वाटतंय? या क्रेव्हिंग्स मागचं कारण जाणून घ्या

EPFO New Rules: आता पीएफ खात्यातून ९० टक्के रक्कम काढू शकता, पण असतील 'या' अटी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मोठी कारवाई! बड्या नेत्याचा घेतला तडकाफडकी राजीनामा; राज्याच्या राजकारणात खळबळ

NASA Research : चंद्रावरही होणार बटाट्याची शेती, शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना मोठं यश, हा प्रयोग नेमका आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT