Dating Mistake Saam Tv
लाईफस्टाईल

Dating Mistake : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडशी लग्न करायचंय? मग डेटिंग करताना करु नका या चुका

Early Dating Mistake : सध्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम लोकांच्या नात्यावरही दिसून येतो.

Shraddha Thik

Avoid These Mistakes In Early Dating :

सध्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम लोकांच्या नात्यावरही दिसून येतो. त्यामुळे आजकाल डेटिंग करणे खूप कठीण झाले आहे. या धावपळीच्या जीवनात, जोडप्यांमधील प्रणयक्रीया देखील बरीच कमी झालेली दिसते. तसेच रोमान्सची कल्पना पूर्णपणे बदलली आहे असेही दिसून येते.

आता लोकांना फक्त प्रेमळ जोडीदाराचीच गरज नाही तर प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असा आदर्श जोडीदार हवा आहे. त्याच वेळी, ऑनलाईन (Online) डेटिंगची प्रक्रिया ही आणखी कठीण आणि वेगळीच झाली आहे.

जेव्हा रिलेशनशीप सुरू होतात तेव्हा लोक खूप उत्सुक आणि चिंताग्रस्त असतात. कारण तुम्ही सुरूवातीला समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या सवयींना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही अशी वेळ असते ज्यात तुमच्या आणि जोडीदारामध्ये एक मजबूत कनेक्शन (Connection) तयार होत असते. पण या सुरुवातीच्या काळात लोक काही चुका करतात त्यामुळे नात्यावर परिणाम होतो. अशा चुका टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्हालाही डेटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर काही चुका करणे टाळा. जाणून घ्या

शारीरिक जवळीक

डेटिंगच्या (Dating) अगदी सुरुवातीला शारीरिक संबंध करणे हे तुमच्या नात्यासाठी चांगले मानले जात नाही. यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या पुढे जाता, पण तुमच्या दोघांमधील भावनिक संबंध तुटतो. अनेक वेळा या कारणांमुळे काही दिवसातच लोकांचे नाते तुटते.

गुप्तहेर बनणे

नातेसंबंधातील आपल्या जोडीदाराची चौकशी करणे अगदी सामान्य आहे, परंतु बऱ्याच वेळा लोक डेटिंगच्या सुरुवातीस अशा गोष्टी करण्यास सुरवात करतात. यामुळे समोरच्याला असे वाटते की तुमचा त्याच्यावर विश्वास नाही. असे केल्याने तुमचे नाते सुरुवातीलाच तुटू शकते.

खूप लवकर अपेक्षा करणे

डेटिंगच्या अगदी सुरुवातीला कोणीही तुमचा लाईफ पार्टनर बनत नाही. डेटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजून घेता आणि नंतर तुम्ही जोडीदार बनता. अशा स्थितीत, सुरुवातीच्या टप्प्यातच व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी तिच्यावर दबाव आणणे हे तुमच्या डेटिंगसाठी धोकादायक ठरू शकते.

मेसेजिंग

डेटिंग करत असताना एकमेकांशी रोज बोलणं खूप गरजेचं आहे, पण अति मेसेजिंगमुळे समोरची व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते. बऱ्याच वेळा, जास्त मेसेजिंगमुळे तुमचे खरे कनेक्शन कमकुवत होऊ लागते. अशा स्थितीत खूप मेसेज पाठवण्यापेक्षा समोरासमोर बसून बोलणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT