Dark Circles  Saam TV
लाईफस्टाईल

Dark Circles : डार्क सर्कल्समुळे चेहऱ्यावरील सौंदर्य कमी झालंय, करा हे घरगुती उपाय

या डार्क सर्कलवर तुम्ही वेळेवर उपचार केले नाहीत तर ते तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अनेक मुला-मुलींच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल (Dark circle) असतात. तसेच काळे डागही असतात. आणि या डार्क सर्कलमुळे आपला चेहरा खराब दिसतो. आणि हे डाग चेहऱ्यावर येतात ती सतत कामाचा ताण, झोप न लागणे, हार्मोनल (Hormonal) बदलामुळे, तसेच रोजरोज बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे ही समस्या उद्धभवते.

तसंच जर या डार्क सर्कलवर तुम्ही वेळेवर उपचार केले नाहीत तर ते तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. काही रसायनांवर औषधांनी यावर लवकर उपचार करता येतात. परंतु त्वचा अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे घरगुती उपायांनी तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि डार्क सर्कल दूर होतील आणि त्यांचा काही साईडइफेक्ट्स होणार नाही.

डार्क सर्कल दूर करण्याचे घरगुती उपाय पुढील प्रमाणे -

1. टोमॅटो

टोमॅटो (Tomatoes) हे डार्क सर्कल घालविण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणून काम करतो. तसेच तो त्वचा मुलायम बननतो. एक चमचा टोमॅटोच्या रसामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि डोळ्यांजवळील डार्क झालेल्या भागावर लावा आणि 10 मिनिटे तो तसाच ठेवा. त्यानंतर तो रस पाण्याने धुवा. ही प्रक्रिया दिवसातून २ वेळा करा. याशिवाय तुम्ही रोज टोमॅटो आणि लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता, ज्यामुळे डार्क सर्कल दूर होण्यास मदत होईल.

2. बटाटे

कच्चे बटाटे बारीक करून त्याचा रस काढा. हा रस एका कपड्यात भिजवून डोळे बंद करून डार्क सर्कलवर लावा. तसंच या रसात भिजवलेल्या कपड्याने डोळे वगळता डार्क सर्कल असणाऱ्या डोळ्याजवळील भागावर लावा 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा.

3. थंड टी बॅग

थंड टी बॅग देखील डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करते. ही टी बॅग पिशवी पाण्यात भिजवून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर डोळे बंद करून ती टी बॅग डार्क सर्कलवर ठेवा, असे दररोज केल्याने काही दिवसांत त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.

4. थंड दूध

थंड दुधामुळे डार्क सर्कल जाण्यास मदत होते. थंड दूध हे डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. थंड दूध (Milk) एका सुती कपड्यात भिजवून डोळ्याखालील भागात ठेवावे.

5. संत्र्याचा रस

संत्र्याच्या रसानेही डार्क सर्कल दूर करता येतात. संत्र्याचा रस आणि ग्लिसरीनचे काही थेंब मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डार्क सर्कल होतात. शिवाय त्वचेवर चमकही येते.

6. योग/ध्यान

तणाव, झोप न लागणे, हार्मोनल बदल, जीवनशैलीतील बदल यामुळे डार्क सर्कल होतात. डार्क सर्कल दूर करण्यात योग आणि ध्यानाचीही महत्त्वाची भूमिका आहे. ते तुमच्या शरीरावर नियंत्रण ठेवते.

टीप - "वरील उपाय करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या"

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Indian Squad: मुंबईची पलटण तयार ! आगामी हंगामात या तगड्या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? आठवलेंच्या दाव्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून ट्विस्ट

Nagpur Accident : पिकनिकला निघालेली शाळेची बस उलटली; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरातील दुर्दैवी घटना

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Madhur Bhandarkar: 'सुपरस्टारची पत्नी होणे सोपे नाही....' ; पाहा मधुर भांडारकरचा आगामी चित्रपट

SCROLL FOR NEXT