Curd Eating Saam Tv
लाईफस्टाईल

Curd Eating: रात्री जेवल्यानंतर दही खायला आवड? आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम; जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ

Curd Eating: रात्री दही खाण्याची सवय आहे? काही व्यक्तींना यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या रात्री दही खाण्याचे संभाव्य परिणाम आणि दही खाण्याची योग्य वेळ कोणती.

Shruti Vilas Kadam

Curd Eating: दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. दह्यामध्ये प्रॉटिन, कॅल्शियम आणि शरीरासाठी आवश्यक पोषक घटक असतात. दह्यामुळे पचनासही मदत होते. अनेकांच्या रोजच्या जेवणात दह्याचा समावेश असतो. काही जणांना दही खाण्याची इतकी सवय असते की ते रात्रीच्या जेवणातही आवडीने दही खातात. मात्र, रात्री दही खाणे योग्य आहे का? असा अनेकांच्या मनात प्रश्न असतो. आयुर्वेदात रात्री दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः ज्यांना पचनाचा किंवा श्वसनाचा त्रास आहे, त्यांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

रात्री दही खाल्ल्याने पोटात जड होऊ शकतं

रात्री दही खाल्ल्यानंतर काही लोकांना पोट जड झाल्यासारखं वाटू शकतं. दही खाल्ल्यानंतर ते व्यवस्थित पचले नाही तर मळमळल्या सारखं होऊ शकते. अशावेळी ज्यांना पचनाचा त्रास होतो, त्यांनी रात्री दही खाणे टाळावे. ज्यांना आधीपासून पचनाच्या समस्या आहेत, त्यांना रात्री दही खाल्ल्याने गॅस किंवा अपचनाचा त्रास जाणवू शकतो. काही वेळा पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा समस्या होऊ शकतात.

सर्दी आणि खोकल्याचा त्रास असल्यास काळजी घ्या

सर्दी, खोकला किंवा घशात खवखव असलेल्या रात्री दही खाणे टाळावे. विशेषतः थंड दही खाल्ल्याने घशाला त्रास आणखी वाढू शकतो. सायनस किंवा नाक बंद होण्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना दही खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींनी रात्री दही खावे की नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जास्त आंबट दही खाणे टाळा

दही जास्त वेळ ठेवल्यामुळे त्याची चव आंबट होऊ शकते. अशा दह्यामुळे काही लोकांना पोटात जळजळ जाणवू शकते. त्यामुळे ताजे आणि कमी आंबट दही खाणे निवडा. काही लोकांना सांधेदुखी किंवा शरीरात सूज येण्याची समस्या असते. अशा व्यक्तींनी रात्री दही खाल्ल्यानंतर त्रास वाढतो का, याकडे लक्ष द्यावे. दही खाण्यासाठी दुपारची वेळ योग्य असते. दुपारच्या जेवणासोबत ताजे दही खाऊ शकता. रात्री दही खाण्याऐवजी गरम वरण, सूप किंवा पचायला हलके पदार्थ खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. दही खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Jan Dhan Yojana : जनधन खात्यात पैसे नसले तरी मिळणार १० हजार रुपये; मोदी सरकारची मोठी सुविधा

पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; २१ वर्षीय महिलेने संपवले जीवन, पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: नागपुरात ठाकरे गट आक्रमक; बाळासाहेबांच्या फोटोच्या कथित विटंबनेविरोधात निषेध आंदोलन

कावळा अन् गिधाडात निवडणूक झाली, नाशिकचा मानचिन्ह म्हणून दणदणीत विजय कोणाचा?

BJP MLA : भाजप आमदाराला ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT