Winter Health Care  Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Health Care : हिवाळ्यात करा डिंकाच्या लाडूचे सेवन !

हिवाळयात डिंकाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Health Care : हिवाळयात डिंकाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच डिंकाचे लाडू गरोदर महिल्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. गरोदर स्त्रियांनी डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे. डिंक म्हणजे झाडाचा चिक होय.

डिंक झाडांच्या खोडातून काढला जातो, आणि डिंक तयार केला जातो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे. थंडी म्हंटल्यावर डिंकाचे लाडू आले. हिवाळयात जास्त प्रमाणात डिंकाचे लाडू बनवले जाते. डिंक, गव्हाचं पीठ, तुप, खोबरं, गुळ आणि भरपुर सुका मेवा हे मिश्रण वापरून लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून डिंकाचे लाडू दिले जातात.

हिवाळयात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते, आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत देखील राहते. म्हणून डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे. त्यामुळे शरीराला अनेक फायदे देखील होतील.

डिंकामुळे शरीराला उब देखील मिळते. आणि हिवाळयात शरीराला उबची खूप गरज असते. तसेच ऊर्जा देखील मिळते. तसेच गरोदर महिल्यांसाठी देखील डिंकाचे लाडू खूप फायदेशीर आहे. गरोदर पणात बाळंतिणीला दूध येण्यासाठी डिंकाचे लाडू दिले जाते.

हिवाळयात पचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुम्ही डिंकाचे लाडू सेवन करू शकता. डिंकाचे लाडू सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, मात्र डिंकाच्या लाडू मध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते, त्यासाठी कमी प्रमाणात आणि गरज असेल तेवढेच सेवन करावे.

रोज २ डिंकाचे लाडू सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पण २ पेक्षा जास्त लाडू खाऊ नये. डिंकाची चिक्कीसुध्दा खायाला चांगली असते. त्यामुळे शरीरात शक्ती देखील राहते. जर तुम्हाला पाठदुखीची समस्या असेक तर तुम्ही डिंकाचे लाडू सेवन करू शकता.

डिंकाच्या लाडू मध्ये फॅट्सचे आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. म्हणून हिवाळयात डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT